(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परप्रांतियांना मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, प्रवासापूर्वीच होणार थर्मल स्क्रीनिंग
परप्रांतीयांची मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी डॉक्टरांकडे रांग लागली होती. गरजू मजूर, कामगारांची यात लूटही होत होती. हीच बाब लक्षात घेत आता या मजुरांची, कामगारांचं प्रवासाआधी विनाशुल्क मेडिकल चेकअप होणार आहे.
मुंबई : लॉकडाऊन-3 लागू करण्यात आलं, मात्र राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन आणि बसेसचीही व्यवस्था केली जात आहे. मात्र प्रवासासाठी संबंधित व्यक्तीकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असणे गरजेचं होतं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी घरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची डॉक्टरांकडे रांग लागली होती. अनेक ठिकाणी या गरजू मजूर, कामगारांची लूटही होत होती. हीच बाब लक्षात घेत या मजुरांची, कामगारांचं प्रवासाआधी विनाशुल्क मेडिकल चेकअप होणार आहे.
प्रवास सुरु करण्यापूर्वी या मजूर, कामगारांची डिजिटल थर्मोमीटरच्या साहाय्याने स्क्रीनिंग होणार आहे. यासाठी या प्रवाशांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. यासाठी सरकार किंवा महापालिकेच्या डॉक्टरांची त्याठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर कोणतीही ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं नसलेल्यांना प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.
Raj Thackeray | लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? : राज ठाकरे