MHT CET Result 2021: एमएचटी-सीईटी ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
MHT CET Result 2021: दरम्यान, भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले जातील.
कोरोना महामारी रखडलेल्या एमएचटी-सीईटी ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल (MHT CET Result 2021) आज (27 ऑक्टोबर 2021) संध्याकाळी 7 वाजता जाहीर झाला. एमएचटी-सीईटीच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येत आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. या परिक्षेच्या निकालाची तारिख जाहीर झाल्यानंतर सर्व विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी उस्तूक झाले होते.
शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेली MHT-CET-2021 ऑनलाईन प्रवेश परीक्षेचा निकाल आज सायंकाळी 7 वाजता उमेदवारांच्या लॉगीनमधून https://mhtcet2021.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात PCB या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल प्रसिद्ध केले.
सीईटी परीक्षेचा निकालामध्ये पीसीएम गटामध्ये 11 विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल गुण प्राप्त झाले आहे. तर, पीसीबी गटामध्ये सतरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के पर्सेंटाइल गुण मिळाले. एमएचटी सीईटी 2021 परीक्षेमध्ये यासाठी राज्यभरातून पीसीएम गटासाठी 1,92,036 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पीसीबी विषयासाठी 2, 22, 932 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सीईटी परीक्षा महाराष्ट्रात राज्यातील 36 जिल्ह्याच्या ठिकाणी 227 परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने 13 दिवसांमध्ये घेण्यात आली होती.
निकाल कसा पाहणार?
- प्रथम महाराष्ट्र सीईटीच्या अधिकृत वेबसाईवर भेट द्या.
- तिथे एमएचटी सीईटी स्कोअरची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- या लिंकवर क्लिक केल्यानंतर येथे दिलेल्या जागेत तुमचा रोल क्रमांक, पासवर्ड आणि जन्मतारीख भरून लॉग ईन करा.
- लॉग ईन करताच तुमचा निकाल समोर येईल.
महत्वाचे म्हणजे, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपली जन्मतारिख, रोलनंबर इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. या परिक्षेत पात्र झालेले विद्यार्थ्यी पुढे काऊन्सेलिंग सेशनसाठी पात्र असतील. त्याचबरोबर मिळालेल्या गुणांनुसार विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीच्या फेऱ्यांसाठी ते पात्र ठरतील. त्यानंतर त्यांचा प्रवेश निश्चत होईल, असे राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या-
- IIT JEE Advance Results: जेईई अॅडवान्स परीक्षेचा निकाल जाहीर, मृदूल अग्रवाल देशात पहिला, मुलींमधून काव्या चोप्राची बाजी
- JEE Main 2021: जेईई मुख्य संयुक्त प्रवेश परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI