एक्स्प्लोर

घरगुती वादातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहितेने स्वतःला पेटवून घेतले, डॉक्टर पती भाजला

अंगावर रॉकेल असल्याने क्षणातच त्या आगीच्या लपेट्यात आल्या. यावेळी पती वाचवायला गेले असता ते ही चांगलेच भाजले. पत्नी योगिता 95 टक्के तर पती चेतन 20 टक्के भाजले. या दोघांवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विवाहित महिलेने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टर पती देखील भाजला आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. या घटनेत पत्नी योगिता चौधरी या 95 टक्के तर पती डॉ चेतन चौधरी 20 टक्के भाजले आहेत. माहितीनुसार, चिंचवड येथे डॉ चेतन चौधरी आणि योगिता चौधरी हे पती-पत्नी आणि सासू-सासरे एकाच घरात राहतात. लग्नाला नऊ वर्ष झालेल्या या दोघांना एक सात वर्षाचं मूल आहे. मात्र या दोघांमधील वादविवाद काय थांबत नव्हते. यातूनच एकाच घरात राहून पती-पत्नी आणि सासू-सासरे वेगवेगळा स्वयंपाक करू लागले. उतार वयात सासू काम करू शकत नसल्याने एक बाईला त्यांनी कामाला ठेवलं होतं. शुक्रवारी योगिताला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आल्याने तिने त्या बाईला चपात्या करायला सांगितल्या. पण त्या बाईने ठरलंय तितकंच काम करेन असं सासू रजनी यांना सांगून निघून गेली. यावर सासूने तिला चपाती करू न दिल्याचा अर्थ लावत योगिता यांनी सासू-सासऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे आधीच डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मग संतापलेल्या पती चेतन यांनी चिंचवड पोलीस स्टेशन गाठत पत्नी विरोधात तक्रार दिली. त्यानंतर सामंजस्याने प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र घरी गेल्यावर वादाला पुन्हा तोंड फुटलं. पती, सासू आणि सासऱ्यांनी दिलेल्या तक्रारींमुळे योगिता यांचा देखील पारा चढलेला होता. घटनेवेळी सासऱ्यांवर उपचार सुरू असल्याने सासू रुग्णालयात तर पती कामानिमित्त बाहेर होते. मग योगितांनी मुंग्या मारण्याचे औषध पाण्यात टाकून प्राशन केले. त्याआधी दुकानात जाऊन रॉकेल आणले. औषधाने पोटात मळमळू लागल्याने तिने पतीला बोलवून घेतले. घरी आलेल्या पती डॉक्टरने योगिता यांना मारहाण केली. यावेळी पतीने थोडं पत्नीच्या तर थोडं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. हातात काडीपेटी ही घेतली, मात्र पती मारून टाकले या भीतीने पत्नीने काडीपेटी हिसकावून घेतली आणि स्वतःला पेटवून घेतलं. अंगावर रॉकेल असल्याने क्षणातच त्या आगीच्या लपेट्यात आल्या. यावेळी पती वाचवायला गेले असता ते ही चांगलेच भाजले.  पत्नी योगिता 95 टक्के तर पती चेतन 20 टक्के भाजले. या दोघांवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणास ही अटक करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget