एक्स्प्लोर
माथेरानची टॉय ट्रेन बंद करण्यामागे केंद्र सरकारचा डाव: अली पिरभोय
माथेरान: माथेरान टॉय ट्रेन बंद करण्यामागे रेल्वे आणि केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप, अली अकबर आदमजी पिरभोय यांनी केला आहे. अली अकबर पिरभोय हे टॉन ट्रेन बनवणाऱ्या आदमजी पिरभोय यांचे नातू आहेत.
माथेरान स्टेशनचं नाव बदलून पिरभोय यांचं नाव देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून माथेरानची शान असलेली टॉय ट्रेन बंद आहे. त्याचबरोबर टॉय ट्रेन त्याची मालकी आणि रेल्वे स्टेशनचा परिसर ही आमची मालमत्ता असून ती आम्हाला परत करावी, असंही अली अकबर यांनी म्हटलं आहे.
माथेरानची टॉय ट्रेन गेल्या अनेक महिन्यापासून धूळ खात पडली आहे. याला कारण जरी तांत्रिक सांगितले जात असले तरी त्यामागे ते कारण नसून वेगळेच कारण आता समोर येत आहे.
हा वाद सर आदमजी पिरभोय विरुद्ध भारतीय रेल्वे असा आहे. अली अकबर यांनी असा देखील दावा केला आहे की, ही ट्रेन त्याची मालकी आणि रेल्वे स्टेशनचा परिसर ही आमची मालमत्ता आहे जी आम्हला परत करावी. याबाबत त्यांनी हायकोर्टमध्ये केलेल्या याचिकेचा निकाल कधीही लागू शकतो.
अली अकबर यांनी केलेली दुसरी याचिका ही माथेरान हे नाव बदलून त्याचे आदमजी पिरभोय माथेरान हे करावे अशी आहे. जेणे करून लोकांना पहिल्या वहिल्या भारतीय माणसाचे नाव लक्षात राहील. ज्याने स्वखर्चाने ट्रेन बनवली होती.
माथेरान टॉय ट्रेन ही पर्यटकच नाही तर तिथल्या लोकांची देखील लाइफलाइन आहे. त्यामुळे ती लवकरात लवकर सुरु व्हावी अशी अपेक्षा आहे. सोबत आदमजी पिरभोय, ज्यांनी ही ट्रेन मोठ्या मनाने बनवली आणि सुरु केली. त्यांचा विसर सरकार आणि भारतीयांना पडू नये, एवढीच अपेक्षा त्यांचे नातू अली अकबर यांना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement