एक्स्प्लोर

Marathwada Rain Uddhav Thackeray: मराठवाड्यात पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त, उद्धव ठाकरे उद्यापासून मैदानात उतरणार, कसा असणार दौरा?

पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसाठी केंद्राकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केली आहे

Uddhav Thackeray: मराठवाड्यत पावसाने हैदोस घातलाय. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर आता मंत्री,आमदार,  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ लागलेत .  गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे.  शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उदयापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली .

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत .त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत शिवसेना नेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील . शिवसेना उबाठा गटानं मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे दहा हजार कोटी रुपयांचा मदतीच्या पॅकेजची मागणी केली होती . दरम्यान, बुधवारी ( 25 सप्टेंबर ) रोजी ते मराठवाड्यात नुकसानाची पाहणी करणार आहेत .

संजय राऊत यांची सरकारवर टीका 

मराठवाड्यात 70 लाख एकर जमिनीवरील पिके उध्वस्त झाली आहेत .पशुधन, घरे उद्ध्वस्त झाली आहेत .36 लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय . नऊ लाख कोटी रुपयांचा कर्ज असलेलं हे सरकार आहे .दहा हजार कोटी रुपयांची मदत मिळावी अशी आम्ही मागणी केली होती .पिशव्यांमधून मदत वाटायला सुरुवात झाली आहे . हा काय निर्लज्जपणा आहे ? समृद्धी महामार्गातून कंत्राटदारांकडून पैसे घ्या .मराठवाड्यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे . लोक मरत आहेत आणि सरकार प्रचार राजकारण करण्यात मश्गुल आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केली . 

कसा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा ?

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना  उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात उद्या (25 सप्टेंबर ) येणार आहेत .त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर असतील . त्यांच्या अंदाजीत दौऱ्याप्रमाणे सकाळी 11 वाजता ते धाराशिव जिल्ह्यात येतील .साडेबाराच्या दरम्यान बीड तसेच 1.30 वाजता जालना आणि शेवटी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नुकसान पाहण्यासाठी ते येतील .

पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसाठी केंद्राकडे तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केली आहे. किमान 10,000 कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे (Heavy Rain) पैसे तात्काळ जमा करावेत. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये, यासाठी निर्देश देण्याची मागणीही त्यांनी केली. पंचनामे आणि नियम तपासण्यामध्ये वेळ वाया घालवू नये, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांचाही दौरा 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बीडमध्ये दाखल झाले असून बीड, शिरूर, पाटोदा, माजलगाव, परळी तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शिंदे दिवसभर पाहणी करणार आहेत. शशिकांत शिंदे यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. बीड तालुक्यातील पिंपळवाडी गावात पुरात वाहून गेलेल्या आदित्य कळसाने यांच्या कुटुंबाला सांत्वन भेट देऊन शशिकांत शिंदे यांच्या दौऱ्याला सुरुवात होतेय. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा, नागझरी, शिरापूर या गावात अतिवृष्टी ग्रस्त पिकांची पाहणी करून शिंदे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांचा दौरा सुरू असताना विरोधी पक्षातील नेते देखील शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचतायत..

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget