Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार; पाहा संपूर्ण यादी?
Marathwada Liberation Day : औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय ध्वजारोहण मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे.
![Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार; पाहा संपूर्ण यादी? Marathwada Liberation Day maharashtra government announced the list for hoisting flag List of Ministers Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार; पाहा संपूर्ण यादी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/13/66f1e8963a4ad3de35c1de4d4ada9ce31694601863377737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
17 September flag hoisting : रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला मराठवाड्यात मुक्तिसंग्राम दिनी साजरा केला जाणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम (Marathwada Liberation Day) दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदा मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव असल्याने औरंगाबादसह (Aurangabad) विभागात मोठ्या उत्साहात मुक्तिसंग्राम दिन (Liberation Day) साजरा केला जाणार आहे. दरम्यान, मुक्तिसंग्रामदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते. मात्र, अजूनही अनेक मंत्र्यांकडे दोन जिल्ह्यांचा कारभार आहे. याच, पार्श्वभूमीवर ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय ध्वजारोहण मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमातील मंत्र्यांची यादी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे. ज्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त हिंगोली शहरात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. तर हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जालन्यातील शासकीय ध्वजारोहण होणार आहे. गिरीश महाजन नांदेड, धनंजय मुंडे बीड, संजय बनसोडे लातूर, अतुल सावे परभणी आणि तानाजी सावंत उस्मानाबाद येथे शासकीय ध्वजारोहण करतील.
प्रशासनाकडून जोरदार तयारी...
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त औरंगाबादमध्ये 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर प्रशासनाकडून याची जोरदार तयारी करण्यात येत असून, मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक देखील पार पडली आहे. ज्यात, जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी, तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतले. जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम, कृषी, रस्तेविकास, पर्यटन वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशनसाठी, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे, भूमिगत गटार योजना ,स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरात 5 प्रवेशद्वाराचे निर्मिती याबाबत मागणी प्रस्ताव, जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या बळकटी करणासाठी, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल ,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)