एक्स्प्लोर

मोठी बातमी! मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण, दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन आदेश निघाला 

मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचे अधिसूचना तात्काळ काढावी यासाठी दिल्लीला गेले होते.

Delhi:  मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून  हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचे स्वागत केलं जातंय .  त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आलाय. 

मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचे अधिसूचना तात्काळ काढावी यासाठी दिल्लीला गेले होते. तिथून अभिजात मराठी भाषेच्या आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी आज उदय सामंत यांच्या हाती दिली.  आज उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची सदानंद मोरे आणि ज्ञानेश्वर मुळेंसोबत भेट घेतली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची घोषणा झाली असली तरी अधिसूचना न निघाल्याने त्यासंदर्भात ही बैठक होती.

उदय सामंत म्हणाले:

आज आम्ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली. त्यांनी अभिजात भाषेसाठीची अधिसूचना आमच्याकडे सुपूर्द केली आहे. यासाठी मी त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो."उदय सामंत यांनी या अधिसूचनेला ऐतिहासिक म्हणत सांगितले की, "हा एक अनोखा योगायोग आहे. ११ वर्षांपूर्वी, जेव्हा हा प्रस्ताव पाठवला गेला, तेव्हा मी मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो. आज, अभिजात भाषेसाठीचा शासन आदेश (GR) हाती मिळाला तेव्हा मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे." त्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या GR च्या आगमनाला खास महत्त्व असल्याचे नमूद केले.

अभिजात भाषा कशी ठरवली जाते माहिती आहे का?

2004 साली जेव्हा नियम तयार केले गेले, तेव्हा त्या भाषेतील ग्रंथांची पुरातनता आणि हजार वर्षांच्या इतिहासाची नोंद असणं गरजेचं होतं. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाते. त्याचबरोबर साहित्यिक परंपरा मूळ असली पाहीजे आणि दुसऱ्या भाषेतून घेतलेली नसावी. या निकषावर तामिळ ही भाषा अभिजात भाषा म्हणून ग्राह्य धरली गेली.

नोव्हेंबर 2005 मध्ये अभिजात भाषेच्या निकषात सुधारणा करण्यात आली आणि संस्कृतला हा दर्जा मिळाला होता. अभिजात भाषा ठरवण्यासाठी त्या भाषेचा इतिहास हा दीड ते दोन हजार वर्षे जुना असणं गरजेचं आहे. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाते. दुसऱ्या भाषेतून सदर भाषा उसनी घेतलेली नसावी. तसेच त्याची एक स्वतंत्र साहित्य परंपरा असावी.प्राचीन भाषा आणि आधुनिक भाषेत फरक असणं गरजेचं आहे.

हेही वाचा:

Govt Order Issued to Give Classic Status to Marathi Language : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Gaikwad on Disha Salian case | पुरावे नसल्यानेच आदित्य ठाकरेंना क्लीनचीट देण्यात आली- गायकवाडNaresh Mhaske on Disha Salian : बनाव आहे म्हणणाऱ्यांनी तारखा आणि कॉल डिटेल्स तपासावेत- नरेश म्हस्केNitesh Rane on Disha Salian : बलाXXXचा आरोप आहे, अटक करा! दिशा प्रतरणात राणेंची मोठी मागणी...Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian & Aaditya Thackeray: ...तर उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे देश सोडून... रामदास कदमांचं मोठं वक्तव्य
शिवसेनाप्रमुखांच्या नातवावर बलात्काराचा आरोप होणे गंभीर गोष्ट, लाज असती तर उद्धव-आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत देश सोडला असता: रामदास कदम
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Video: ओ अनिल परब, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी, चित्रा वाघ यांचा सभागृहात रुद्रावतार
Chhattisgarh Naxal Encounter : बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
बस्तरमध्ये दोन चकमकीत 24 नक्षलींचा खात्मा; विजापूरमध्ये 20, कांकेर चकमकीत 4 मृतदेह आणि शस्त्रे जप्त, एक जवान शहीद
Disha Salian Case : तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
तीन वर्षापूर्वी 'त्या' पत्रकार परिषदेत दिशा सालियनचे आई-वडील ओक्साबोक्सी रडत काय म्हणाले होते?
Anil Parab : किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती, जयकुमार गोरेंचे उघडे, नाXडे फोटो सभागृहात आले; अनिल परबांचा हल्लाबोल
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE अभ्यासक्रम लागू, शिक्षणमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget