एक्स्प्लोर
Advertisement
धुळ्यात मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार
धुळे : एकापाठोपाठ राज्यभर होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आज आपला मोर्चा धुळ्याकडे वळवला आहे. सांगलीत काल झालेल्या मोर्चाला सांगलीकरांनी तुफान प्रतिसाद दिला. यानंतर आज धुळ्यातही मोठी गर्दी जमण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देखील सहकुटुंब या मोर्चात सहभागी होणार आहेत.
धुळ्यातील गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होऊन महानगरपालिकामार्गे शिवतीर्थ चौक असा मोर्चाचा मार्ग आहे. शिवतीर्थ चौक इथेच मोर्चाचा समारोप होईल. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
तीन हजार स्वयंसेवक ज्यात दोन हजार पुरुष आणि एक हजार महिला, 25 गट प्रमुख, 11 विभाग प्रमुख, एसआरपीएफ प्लाटूनसह अतिरिक्त पोलिस तैनात मोर्चासाठी तैनात असतील.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सर्व शाळा, कॉलेज बंद राहणार आहेत. एसटी बसही धुळे शहराच्या बाहेरुन वळवण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरात चारही बाजूने येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement