Maratha Reservation Protest LIVE : जालन्यात पुढील दोन दिवस इंटरनेट सेवा बंद
Maratha Reservation Protest : मराठा आंदोलनाला आता अधिकच झळ बसू लागली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहे. मराठा आंदोलनाचे प्रत्येक अपडेट क्लिकवर

Background
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या सात दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहामुळे जरांगे आजपासून पाणी पिणार आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात. उग्र आंदोलन होत असल्याने आंदोलकांच्या आग्रहाने ते पाणी घेणार आहे. पाणी घेत नसल्याने तब्येत खालावत असल्याने आंदोलक हिंसक होत असल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी निर्णय घेतला आहे.
Maratha Protest Nanded : नांदेडमध्ये रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग, राज्यमार्ग व इतर मार्गांवर उपोषण, धरणे, मोर्चे, रॅली आदी आयोजनावर निर्बंध
नांदेड : जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय, सर्व राज्य महामार्गावर व इतर सर्व मार्गांवर वाहतूक आवा-गमन सुरळीत चालू राहण्याच्यादृष्टीने नमूद ठिकाणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढील आदेशापर्यंत उपोषणे, धरणे, मोर्चे, रॅली, रास्ता रोको, आंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास, आयोजित करण्यास प्रतिबंध केले आहे.
Jalna News : जालन्यात पुढील दोन दिवस इंटरनेट सेवा बंद
Jalna News : जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्यातच आता पुढील दोन दिवस जालन्यातील इंटरनेट सेवा ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.























