एक्स्प्लोर
मराठा आरक्षण : आज राज्यभरात बैठकांचं आयोजन
पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. तर मुंबईतही बैठक होणार आहे. 9 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाची दिशा यामध्ये निश्चित होणार आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पुण्यात मराठा आरक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. या परिषदेत मराठा समाजातील मान्यवर समन्वयक, संशोधक, तज्ञ आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहेत.
दुपारी एक वाजता पुण्यातील रेसिडन्सी क्लबमध्ये ही परिषद होणार आहे. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
दरम्यान, आज पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद होणार आहे.
दुसरीकडे मुंबईतही मराठा संघटनांची आज बैठक होणार आहे. 9 ऑगस्टला पुकारलेल्या आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. सकाळी 11 वाजता घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे.
राज्यात आंदोलन सुरुच
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाजाचं आंदोलन सुरुच आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आज धुळ्यात खासदार सुभाष भामरे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. तर पालघरमध्येही मराठा संघटनांकडून धरणे आंदोलन केलं जाणार आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या परळीतल्या ठिय्या आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे.
पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे काल भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक घोषणा देत असताना स्वतः खासदार काकडेही त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी देखील घोषणा दिल्या. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात येतं असलेली लोकप्रतिनिधींच्या घरासमोरची आंदोलनं ही स्टंट आहेत असं वक्तव्य केलं. त्यानंतर आमदार मेधा कुलकर्णी यांच्या या वक्तव्याबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे आक्षेप घेण्यात आला.
धनगर समाजही आक्रमक
दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक झाला आहे. पुण्यात आज आरक्षणाच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय धनगर नेत्यांची बैठक होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात धनगर समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेत आरक्षणाची मागणी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
