एक्स्प्लोर

मोठी बातमी! सगेसोयरे शब्दाबाबतचा 'मसुदा' एबीपी माझाच्या हाती; पाहा संपूर्ण मुद्दे...

Maratha Reservation : अध्यादेशातील कच्चा मसुदा आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या बदलाची एक्सक्लुझिव्ह माहिती 'एबीपी माझा'ला मिळाली आहे. 

Maratha Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि सरकारमधील सगेसोयरे शब्दावरून गेल्या काही दिवसांपासून होत असलेला काथ्याकुट समाप्त होण्याची चिन्ह दिसत आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यामार्फत मनोज जरांगे यांना दिलेल्या कच्या मसुद्यात काही बदल करून आज किंवा उद्या कुणबी प्रमाणपत्रासाठीचा अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जरांगे यांनी सरकारला अध्यादेशासंबंधी काही बदल सुचवले आहेत. तर, अध्यादेशातील कच्चा मसुदा आणि मनोज जरांगे यांनी सुचवलेल्या बदलाची एक्सक्लुझिव्ह माहिती 'एबीपी माझा'ला मिळाली आहे. 

सरकारने दिलेला अंतिम मसुदा असा होता...

  • कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सग्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे पुरावा उपलब्ध करून दिल्यास, तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.
  • कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्य अंतर्गत झालेल्या स्वजातीय विवाहतून तयार झालेल्या सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र, या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सोहजाती आहे. या संदर्भातील पुरावा देणे तथागृह चौकशीत अशा प्रकारचा पुरावा मिळणे आवश्यक असेल.
  • सदरची यादी सूचना अनुसूचित जाती, मुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

असा बदल करण्याची जरांगे यांची मागणी

  • कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तथा पितृसत्ताक पद्धतीतील सग्यासोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत, असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.
  • कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्य अंतर्गत झालेल्या स्वजातीय विवाहतून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून, सदर विवाह सोहजाती आहे या संदर्भातील पुरावा देणे तथागृह चौकशीत अशा प्रकारचा पुरावा मिळणे आवश्यक असेल.
  • सदरची यादी सूचना अनुसूचित जाती, मुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. 

जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम...

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट देखील घेतली आहे. मात्र, आरक्षण मिळाले आणि नाही मिळाले तरीही आम्ही मुंबईला जाणारच असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. जर आम्हाला आरक्षण मिळाले तर आम्ही गुलाल घेऊन मुंबईला जाणार आहोत, आणि आरक्षण मिळाला नाही तर ते आरक्षण आणण्यासाठी मुंबईला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

पंतप्रधान मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही, आम्ही लढून आरक्षण मिळवणार; जरांगे स्पष्टचं बोलले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget