Chhagan Bhujbal : ...अन्यथा ओबीसी समाजाचंही आंदोलन सुरु होईल, छगन भुजबळ यांचा इशारा
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असे माझे देखील म्हणणे आहे. पण ओबीसीवर अन्याय होता नये या मतावर आम्ही ठाम आहोत, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
Chhagan Bhujbal मुंबई : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वाशीमध्येच आंदोलन मागे घेण्याबाबत मनोज जरांगे यांना विनंती केली आहे. पण मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. आझाद मैदानात जाऊन घोषणा करण्याबाबत मनोज जरांगे ठाम आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, कायद्याच्या कसोटीत जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजकाल कुणीही कोर्टात जातो, त्याची चिरफाड होते त्यामुळे कायद्यात काय बसेल त्यानुसार होईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, असे माझे देखील म्हणणे आहे. पण ओबीसीवर अन्याय होता नये या मतावर आम्ही ठाम आहोत, असे भुजबळ म्हणाले आहेत.
...तर ओबीसी समाजाचेही आंदोलन सुरू होईल
ओबीसींवर अन्याय झाला तर निश्चितपणे ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू होईल, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला आहे. दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय सरकार घेईल. आम्ही आमची मतं जाहीर सभेतून मांडतो आणि आम्ही त्याला विरोध देखील करतो आणि आम्ही ती मांडू, असे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढची चर्चा आपण करूया. राज्य सरकारच्या शिष्टमंडळांना जीआरसाठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहेत त्यात काय दुरुस्ती आहे, त्यात नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत, ते सगळं आपण चर्चा करून ठरवू. कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सगळ्यांसमोर चर्चा करून निर्णय घेईल, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य - दीपक केसरकर
मंत्री केसरकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य झाल्या आहेत. शासकीय विहित नियम असतात त्यानुसार अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले की आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र दिले होते. परंतु आता आणखी देऊन 50 लाखांच्या वरही संख्या जाणार आहे.
मनोज जरांगेंना शिष्टमंडळाची विनंती
वाशीतच आंदोलन मागे घेण्याची मनोज जरांगेंना शिष्टमंडळाची विनंती केली आहे. मात्र, आझाद मैदानात जात घोषणा करण्यावर जरांगे आग्रही आहेत. मुंबईत येण्यावर ठाम राहिल्यास अटल सेतू वापराची विनंती शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून पाच ते सहा अध्यादेश काढण्यात आले आहेत. शिष्टमंडळाची मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा झाली आहे.
आणखी वाचा
Dada Bhuse : "हो म्हणायला कोणीही हो म्हणेल, पण...; मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे वक्तव्य