Rahul Gandhi : ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं झटपट उत्तर
Election Commission On Rahul Gandhi : हरियाणात प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार असून त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

मुंबई : महाराष्ट्र प्रमाणेच हरियाणामध्येही निवडणूक (Haryana Election) चोरली असून 25 लाख बोगस मतदान झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. ब्राझिलच्या मॉडेलच्या नावाने हरियाणात 22 वेळा मतदान करण्यात आलं, एकाच महिलेच्या नावाने 223 वेळा मतदान करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. आता राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने (Election Commission) उत्तर दिलं आहे. काँग्रेसकडून या संबंधी एकही तक्रार आली नाही, तसेच मतदान होत असताना काँग्रेसच्या पोलिंग एजंट्सनी आक्षेप का घेतला नाही असा प्रतिप्रश्न आयोगाने केला. तसेच या संबंधी राहुल गांधी कोर्टातही जाऊ शकतात असा सल्लाही आयोगाने दिल्याची माहिती आहे.
राहुल गांधींना काही प्रश्न असतील तर त्यांनी निवडणूक आयोगामध्ये रितसर तक्रार करावी, पुरावे द्यावेत असं आयोगाने म्हटलं आहे. तसेच राहुल गांधींना उच्च न्यायालयाचे दरवाजेही खुले असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला असून काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. हरियाणात प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार असल्याचाही आरोप राहुल गांधींनी केला.
Election Commission On Rahul Gandhi : काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते?
राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने काँग्रेसवरच काही सवाल उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे मतदान प्रतिनिधी (Polling Agents) मतदान केंद्रांवर काय करत होते? जर कोणत्याही मतदाराने आधीच मतदान केलं असेल किंवा मतदान प्रतिनिधीला त्या मतदाराच्या ओळखीवर शंका आली असेल, तर त्यांना ताबडतोब हरकत (Objection) नोंदवायला हवी होती असं आयोगाने म्हटलं.
Election Commission On Fake Voters Issue : ते भाजपचेच मतदार कसे?
बनावट मतदारांच्या (Fake Voters) मुद्द्यावरही निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. मतदार यादीतील दुरुस्तीदरम्यान (Voter List Revision) काँग्रेसचे बीएलए (Booth Level Agents) यांनी एकाही नावाबद्दल दावा किंवा हरकत का घेतली नाही? जरी हे मतदार बनावट असले तरी, त्यांनी भाजपलाच (BJP) मतदान केलं असं कसं म्हणता येईल?”
Election Commission On Congress : काँग्रेसकडून एकही अपील नाही
हरियाणाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या राज्यातील 90 मतदारसंघातील निवडणुकीच्या विरोधात फक्त 22 याचिका (Election Petitions) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. नियमांनुसार, जर कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला वाटत असेल की मतदार यादीत (Voter List) किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेत काही गडबड झाली आहे, तर त्याविरोधात अपील दाखल करता येते. मात्र, काँग्रेसकडून एकही अपील दाखल करण्यात आलं नाही असं आयोगाने स्पष्ट केलं.
Election Commission on Poll Irregularities : हायकोर्टात जाऊ शकता
नियमांनुसार, जर कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीच्या निकालांबद्दल आक्षेप असेल, तर तो हायकोर्टाचा (High Court) दरवाजा ठोठावू शकतो. हरियाणा निवडणुकीच्या प्रकरणात सध्या 22 अपीलं न्यायालयात प्रलंबित आहेत.
ही बातमी वाचा:


















