एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'सत्ताधाऱ्यांना थांबवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं', Nashik मध्ये काँग्रेस नेते Shyamraj Khaire यांचे वक्तव्य
नाशिकमध्ये (Nashik) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मतदार याद्यांमधील (Voter List) घोळाच्या निषेधार्थ काँग्रेसने निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) 'ओटचोरी गद्दीचोड' नावाने स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून, पक्षाचे नेते श्यामराज खैरे (Shyamraj Khaire) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. खैरे म्हणाले, 'स्थानिक स्तरावर जे जे विरोधीपक्षाचे सगळे जे लोक आहेत ते एकत्रितपणे या सत्ताधारी पक्षाच्या ह्या लोकांना थांबविण्यासाठी सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते एकत्र येऊन यांना आपल्याला थांबवावं लागणार आहे'. काँग्रेसने एकीकडे स्वबळाचा नारा दिला असला तरी, दुसरीकडे समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची शक्यताही वर्तवली आहे. राज्यभरात मतदार यादीतील त्रुटींवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, नाशिकमधील ही स्वाक्षरी मोहीम त्याच आंदोलनाचा एक भाग आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
रायगड
Advertisement
Advertisement

















