एक्स्प्लोर
आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांमध्ये फूट
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सध्या मराठा बांधव आंदोलन करत आहेत. परंतु आंदोलक मराठा बांधवांमध्ये दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सध्या मराठा बांधव आंदोलन करत आहेत. परंतु आंदोलक मराठा बांधवांमध्ये दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा असे दोन गट पडले आहेत. आंदोलकांमध्ये फूट पडल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत.
मराठा क्रांती मोर्चातले आंदोलक सरकारचे हस्तक असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चातील आंदोलकांनी केला आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाने "आमचा सरकारशी काहीही संबंध नाही" असे दिले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य समन्वयकांची बैठक आजाद मैदानात होणार आहे.
विरोधकांच्या मनात काळंबेरं, पण मराठा आरक्षण देणारच : मुख्यमंत्री
दरम्यान मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे यावर बुधवारी मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. मराठा समाजाला 12 टक्के, 14 टक्के की 16 टक्के आरक्षण द्यायचे यावर आज मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यामुळे किती टक्के आरक्षण द्यायचे याबाबत आज महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
संबंधित बातम्या
मराठा समाजाला किती टक्के आरक्षण? आज निर्णय
मराठा आरक्षणाचा ATR आज विधानसभेत; भाजप, शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी मुख्यमंत्री-गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच, तोडगा नाहीच मराठा आरक्षण 5 डिसेंबरला लागू होणार : सूत्र आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालावर एटीआर मांडणार मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement