एक्स्प्लोर
तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी
मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.
औरंगाबाद: वळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.
इतकी आंदोलन करुनही मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा मराठा मोर्चाने केली. 15 ऑगस्टपासून एकवेळ अन्नत्याग आंदोलन सुरु होईल, असं विनोद पाटील म्हणाले.
आम्ही प्राण देणारे आहोत, पण आमच्यावर हिंसेचा आरोप होत आहे. वळूज एमआयडीसीतील तोडफोड केवळ एमआयडीसीची नाही तर शहराच्या अस्मितेची तोडफोड आहे, त्या घटनेचा निषेधच आहे. संपूर्ण घटनेची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी यावेळी मराठा मोर्चाने केली.
आम्ही शांततेने मोर्चे काढणारे आहोत, तोडफोड करणारे नाहीत, आम्ही सर्वजण जाऊन MIDC मधील कंपनीचालकांना भेटणार आहोत, असं यावेळी विनोद पाटील यांनी सांगितलं.
कालच्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध, निंदा करतो, मराठा मोर्चा बदनाम होऊ नये म्हणून सीआयडी चौकशीची मागणी करतो, असं पाटील म्हणाले.
आम्ही चोर नाही, सत्य बाहेर येऊ द्या, सर्वोच्च चौकशी करा, जे चोर आहेत, त्यांची जागा जेलमध्ये आहे. ज्यांनी तोडफोड केलीय त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ नका, असं त्यांनी नमूद केलं. औरंगाबाद, चाकण, नवी मुंबईत ज्या काही तोडफोडीच्या घटना घडल्या, त्या एकसारख्याच आहेत. त्या शहरात नव्हे तर शहराबाहेर-एमआयडीसी परिसरात घडल्या. आंदोलन संपल्यानंतर घडल्या, त्यामुळे या घटना मराठा मोर्चाशी जोडू नयेत, त्या घटनांचा आम्ही निषेध करतो. सीआयडी चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असं विनोद पाटील म्हणाले.
तसंच मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, हिंसाचार करु नये, असं आवाहन विनोद पाटील यांनी केलं.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement