एक्स्प्लोर

भिवंडी शहरापासून हाकेच्या अंतरावर पाण्याची भीषण टंचाई; नदीत खड्डे मारून खड्ड्यातील पाण्यावर भागवावी लागते तहान

भिवंडी तालुक्यातील लाखिवली ग्रामपंचायत हद्दीमधील असलेल्या कोल्हाचा पाडा परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून तहान भागवावी लागते आहे.

 भिवंडी : भिवंडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक आदिवासी वस्त्यांवर भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे . येथील आदिवासी बांधवांना कोरड्या नदीत ओलावाच्या ठिकाणी खड्डा खोदून खड्ड्यात साचलेल्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे . मात्र शासकीय यंत्रणांचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. आदिवासी पाड्यातील पाणी समस्येवर श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाण्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध केली नाही तर तालुका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे . 

भिवंडी तालुक्यातील लाखिवली ग्रामपंचायत हद्दीमधील असलेल्या कोल्हाचा पाडा परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून तहान भागवावी लागते आहे. गेल्या पाच महिन्यापासून पाण्याची चणचण भासत असून हंडा भर पाण्यासाठी नदीपात्रात खड्डा खोदून त्या खड्यात झाऱ्याने साचलेल्या पाण्यात नागरिक आपली तहान भागवतात मात्र प्रशासनाचे  याकडे दुर्लक्ष होत आहे . 

 भिवंडी तालुक्यात तब्बल 43 गाव पाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेच्या वतीने तालुका प्रशासनासह तहसीलदारांकडे केली आहे. लाखिवली या गावातील कोल्ह्याचा पाडा, वाण्याचा पाडा येथील आदिवासी कुटुंबियांवर तर खड्ड्यातील गढूळ पाणी पिण्याची वेळ आली असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या पाणी टंचाईच्या समस्येबाबत मागील आठवड्यात भिवंडी पंचायत समितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवेळी श्रमजीवी संघटनेने पाणी टंचाईचे भीषण वास्तव तालुका प्रशासनासमोर कथन केले असूनही  अनेक वेळा तक्रारी करण्यात आले आहे.  तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने केला आहे. 

भिवंडी ग्रामीणमधील  जांभूळ पाडा, तेलिवडे पाडा, कोल्हा पाडा, येवई बारी पाडा, कांबे पागीपाडा, राहनाळ आनंद नगर, सावित्रीबाई फुले नगर, काटई ठेंगू पाडा, पारिवली कातकरी वाडी, अंबाडी उबरपाडा, उबरखांड (वाकीपाडा), नेवाडे, घोटगाव, दुगाड तोंडीचीवाडी, वेढे, वारेट, उसगाव, पिळंझे बुद्रुक व पिळंझे खुर्द अशा तब्बल 43 आदिवासी पाड्यांवर पाणी समस्या असल्याची माहिती  संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

याबाबत भिवंडी तहसीलदार यांना फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रारी आल्या तर आम्ही टँकरने पाणीपुरवठा नक्की करणार असे आश्वासन दिले आहे.  परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना वणवण करून पाण्यासाठी नदीत खड्डा मारुन आपली तहान भागवण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. निवडणुका आल्या की मत मागायला सर्व येतात मोठमोठी आश्वासने देतात तुम्हाला विहीर बांधून देऊ तुम्हाला बोरिंग बांधून देऊ परंतु निवडणुका संपल्या की तोंड देखील दाखवत नाही. आम्ही जे पाणी सध्या पितो ते शासनाने पिऊन दाखवावे आमदार, खासदार यांनी आमच्या घरात येऊन हे पाणी पिऊन दाखवणार का असा प्रश्नही येथील नागरिकांनी केला आहे.  तर भिवंडीत आमदार-खासदार केंद्रीय मंत्री असून शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डा मारुन गढूळ पाणी पिण्याची वेळ येत असल्याने नागरिकांनी प्रथम पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

Trending News : पोलीस हवालदाराची भूतदया! तहानेने व्याकूळ माकडाची 'अशी' केली मदत, व्हिडीओ व्हायरल

 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले 'जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत...'
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले 'जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत...'
Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rooftop Solar: भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
भाडेकरूही रूफटॉप सोलरचा फायदा घेऊ शकतात का, काय आहेत नियम? जाणून घ्या सविस्तर
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Divija Fadanvis Video: देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
देवाकडे या मोह-मायेच्या गोष्टी मागू नका.....; देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, दिविजाने सांगितलं देवाला काय आहे प्रिय
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
Embed widget