एक्स्प्लोर

तुळजापुरात मुक्काम, सोलापूरातून सुरुवात; मनोज जरांगेंची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात, असा असेल मार्ग

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव उद्या सोलापुरात एकत्र येणार आहेत.

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या शांतता रॅलीतील दुसऱ्या टप्प्याला उद्या 7 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून त्यांनी शांतता रॅलीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केली होती, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांचा दौरा करत छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी रॅलीची सांगता केली. त्यानंतर, पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी ते अंतरवाली (Antarwali) सराटीत बसले होते. मात्र, शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा करत त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. आता, पुन्हा एकदा त्यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची वाट धरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून त्यांची यात्रा जाणार असून सोलापुरात (Solapur) सुरुवात आणि नाशिकमध्ये यात्रेची सांगता होणार आहे.  

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव उद्या सोलापुरात एकत्र येणार आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा होणार आहे.  शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत असून 13 ऑगस्ट रोजी नाशिक येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा 7 दिवसांचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे. मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता, पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅलीसाठी सकल मराठा समाज पुढाकार घेऊन कामाला लागल्याचं दिसून येत आहे. नुकतेच, मनो जरांगे सोलापूरसाठी अंतरवाली सराटीमधून रवाना झाले असून आज त्यांचा तुळजापूर येथे मुक्काम असणार आहे. 

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली निघत आहे, दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर, आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरा करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीच राजकीय मंडळी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात, यंदाच्या निवडणुकीत आरक्षणा हा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. 

असा असणार शांतता रॅलीचा मार्ग

* 7 ऑगस्ट - सोलापूर 
* 8ऑगस्ट - सांगली
* 9 ऑगस्ट -कोल्हापूर
* 10 ऑगस्ट - सातारा
* 11 ऑगस्ट - पुणे
* 12 ऑगस्ट -अहिल्यादेवी नगर (अहमदनगर)
* 13 ऑगस्ट - नाशिक

हेही वाचा

विधानसभेची खडाजंगी: सोलापुरात 11 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगस्ट 2024 | मंगळवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडेAamir Khan च्या 'या' फ्लॉफ चित्रपटाचे चाहते आहेत Lord of the Rings चे 'हे' कलाकार?Lord of the Rings च्या कोणत्या कलाकाराने Priyanka Chopra सोबत केलं काम?Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
Embed widget