Manoj Jarange Patil : ....अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट ईशारा
Manoj Jarange Patil : छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषी असणार्याला कायमचं जेलमध्ये टाका, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
जालना : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji maharaj) यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. तर राज्यात या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. अशातच या घटनेचा निषेध करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. तसेच त्यांनी दिपक केसरकर यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.
छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषी असणार्याला कायमचं जेलमध्ये टाका. कायदाच एवढा जरब बसला पाहिजे की कुठल्या महापुरुषाचा अपमान करण्यापूर्वी त्याने दहा वेळा विचार केला पहिजे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे फार वेदनादायक आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने याची चौकशी करा, अन्यथा याचे सखोल परीणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यामधून काही चांगलं होईल, असे वादग्रस्त वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं होतं. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केलीय. जारांगे म्हणाले की, ते तर लई हुशार आहेत. त्यांना काय बोलावं हे कळत नसावं, एका मंत्र्यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असं बोलणं म्हणजे अवघड आहे, असं सांगत जरांगे यांनी केसरकर यांच्यावर निशाणा साधलाय. केसरकर यांच्या बोलण्यातील शुभ संकेतचा अर्थ म्हणजे भाजपचं सरकार जातं, असा त्यांचा रोख असावा, असा टोलाही जरांगे यांनी केसरकर यांना लगावलाय.
दीपक केसरकर अफजलखानाची औलाद- संजय राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यामधून काही चांगलं होईल, असे दीपक केसरकरांना वाटते. हे शब्द केसरकरांच्या तोंडातून कसे निघू शकतात. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेत. हे सगळे शिवाजी महाराजांचे का इतके शत्रू झालेत, हे माहिती नाही. हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे. मिंधे यांची टोळी पोसण्याचं काम फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी केले. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पडला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आणखी वाचा
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार, कल्याणमधील घराला टाळं