एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्या तरुणांची भेट; पालकमंत्री गिरीश महाजनांना सुनावले खडे बोल!

धनगर समाजाच्या मागणीला घेऊन लातूर शहरात मागील 12 दिवसापासून दोन तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. परिणामी, त्यांची विचारपूस करण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील हे आज उपोषण स्थळी दाखल झाले आहेत.

Dhangar Reservation लातूर : राज्याचे राजकारण सध्या आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्याला घेऊन अक्षरक्ष: ढवळून निघाले आहे. अशातच लातूर शहरात मागील 12 दिवसापासून धनगर समाजाच्या दोन तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. धनगर समाज (Dhangar Reservation) अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करावी, या मागण्यासाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांनी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मात्र, उपोषणासाठी बसलेल्या या दोघा तरुणांची प्रकृती खालावली आहे. आमरण उपोषणास बसलेल्या चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

परिणामी, त्यांची विचारपूस करण्यासाठी म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. सर्वप्रथम त्यांनी या भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी उपोषण स्थळी भेट दिलीय. यावेळी मराठा धनगर एकजुटीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्यात. 

बारा दिवस झाले, मात्र पालकमंत्री अद्याप फिरकले नाहीत

लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे बारा दिवस झाले उपोषण सुरू होऊन इकडे फिरकले नाहीत. त्यांच्यापर्यंत विषय गेला होता, तरी ते इथे आले नाहीत. अशी माहिती त्यांना ज्यावेळेस मिळाली. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, मी इथे राजकारण करण्यासाठी आलो नाही. कुणी जर आमरण उपोषण करत असतील तर त्यांच्या वेदना मला माहित आहेत. मराठा आणि धनगर समाज याच्या मध्ये वाद नाही. राजकारणी ते लावत असतात. हा विषय गंभीर आहे. गिरीश महाजन साहेबांनी येथे नक्कीच भेट द्यावी. उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे, ते ऐकून घ्यावं. असे मत मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना व्यक्त केलंय

सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी - मनोज जरांगे पाटील

जो मार्ग सत्य असेल त्यात आम्ही आपल्या सोबत आहोत. समाजाच्या न्याय, हक्काच्या मागण्यासाठी पुढे आलेच पाहिजे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या काय आहेत तो विषय समजावून घेतला. हे संपूर्ण निवेदन वाचून घेतो आणि मग यावर आपण सविस्तर बोलू, असे ही त्यांनी यावेळी सागितले. काही काळजी करू नका, सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर

राजकारणी हे जाती जातीत तेढ निर्माण करत असतात. आपण काही राजकारणी नाहीत. आपण आपल्या समाजासाठी, लेकरा बाळाच्या भविष्यासाठी काम करत असतो. धनगर समाजाच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करायलाच पाहिजे. सत्तेत येण्यापूर्वी सत्ता आल्याबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता मागील दहा वर्षापासून झाली नाही. आमरण उपोषण करण हा डेंजर प्रकार आहे. सरकारनं या लेकरांची काळजी घेतली पाहिजे. असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय.
 
इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget