मातोरीत छगन भुजबळांनी दगडफेक करायला सांगितली असेल, त्यांना राज्यात दंगली घडवायच्यात: मनोज जरांगे
मातोरी (Matori) येथील दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा. त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितली असावी असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलाय.
Manoj Jarange Patil : मातोरी (Matori) येथील दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा. त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितली असावी असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलाय. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
नेमकी काय घडली होती घटना?
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे जाऊन भगवान बाबाचे दर्शन करण्याचा नियोजित कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. यावेळी रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मातोरी शहरांमध्ये पोलीस दाखल झाले. या घटनेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दोन्ही समाजांना शांततेचे आवाहन केले आहे. लाठ्याकाठ्या हातात घेण्याचा काळ गेला, गावाची शांतता बिघडवू नका असे म्हटलं आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भुजबळांना वडीगोद्रीतच दंगल घडवून आणायची होती, जरांगे पाटलांचा आरोप
दरम्यान, राज्याच्या आमच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सगळ्या मराठा बांधवांनी जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र यावे असेही जरांगे पाटील म्हणाले. बीडच्या पालकमंत्र्यांना सांगतो की, भुजबळ मराठ्यांना जाणुन बुजून त्रास द्यायला लावतील, मराठ्यांना त्रास होता कामा नये असे जरांगे पाटील म्हणाले. भुजबळ यांना वडीगोद्रीतच दंगल घडवून आणायची होती. पण मी त्यांचा डाव उधळून लावल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांना आता राज्यात दंगल घडवून मराठा-ओबीसी आडकवायचे आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांनी ओबीसींनी शांत राहावे
मातोरीत कुणालाही त्रास होता कामा नये अन्यथा राज्यातील सगळे मराठे तिथे जातील असे जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांनी ओबीसींनी शांत राहावे. सगे सोयऱ्याची आमची व्याख्या घेतल्याशिवाय आम्हाला अंमलबजावणी मान्य नाही असेही जरांगे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Beed News: जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'