एक्स्प्लोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंचं नवं आंदोलन, आजपासून पुन्हा रस्त्यावर! गावोगावी करणार रास्ता रोको आंदोलन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीये. जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये असं फडणवीस म्हणाले. 

मुंबई :  महाराष्ट्रात पेटलेला आंदोलनांचा वणवा आणि मनोज जरांगे आणि मराठा बांधवांचा आक्रमक पाहता, सरकारने एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावल्याचा दावा केला जातोय. मात्र, मनोज जरांगे (Manoj Jarange)  अजूनही समाधानी झालेले नसून, त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय. आजपासून गावोगावी सकाळी 10.30  पासून रास्तारोको आंदोलन करा, दुपारी एक वाजेपर्यंत रास्तारोको करा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा सल्लाही जरांगेंनी दिलाय. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी जरांगेंच्या आंदोलनावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीये. जनतेला त्रास होईल असं आंदोलन कुणीही करू नये असं फडणवीस म्हणाले. 

मनोज जरांगे यांनी सगयासोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी  आजपासून आंदोलनाची हाक दिलीय. आज राज्यभरात एक दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार  आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेमुळे आज आंदोलनाची वेळ बदलून 11 ते 1 करण्यात येणार असून पुढे याच रास्ता रोको आंदोलनाचे रूपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे. 25 फेब्रुवारीपासून राज्यभरात गावागावात ग्रामपंचायत किंवा मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचे अवाहन जरांगे यांनी केलंय. तसचं 25 पासून होणाऱ्या धरणे आंदोलना दरम्यान दररोज आपल्या सगयासोयऱ्याच्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या प्रतिनिधीला द्यायचे आहे, हे निवेदन गावात 10 च्या आत शासनाचा प्रतिनिधी आला पाहिजे तो न आल्यास ,रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. 

पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी

बीड, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, सोलापूर, लातूर, नाशिक, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात पाटील यांनी राज्यभर विविध ठिकाणी एक दिवसीय रास्ता रोकोच्या सूचना मराठा बांधवांना केलेल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम राज्यात विविध ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी आवाहन केलेल्या आजच्या रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोकांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस जारी करण्यात आली आहे.  CRPC 149 अन्वये नोटीस जारी केली आहे.  नोटीस कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे सरकरची डोकेदुखी वाढणार

मनोज जरांगे यांनी आतापर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता. मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा :

Ajay baraskar : अजय बारसकरांवर मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक; सुरक्षेत वाढ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
Embed widget