एक्स्प्लोर

Manoj Jarange Mumbai Rally Live: मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज तिसरा दिवस; असा असणार दिवसभराचा 'दिनक्रम'

Manoj Jarange Mumbai March : आज मनोज जरांगे बाराबाभळीमधून सकाळी 9 वाजता निघणार असून, सुपा येथे दुपारच भोजन करणार आहे. तसेच रांजणगाव (गणपती) येथे आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. 

LIVE

Key Events
Manoj Jarange Mumbai Rally Live: मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज तिसरा दिवस; असा असणार दिवसभराचा 'दिनक्रम'

Background

Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुंबईसाठी काढलेल्या पायी दिंडीचा आजचा तिसर दिवस आहे. रविवारी सकाळी 10 वाजता मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे रात्री उशिरा बाराबाभळी (करंजी घाट) येथे पोहचले. रात्रीचा मुक्काम करून जरांगे हे आज सकाळी पुन्हा मुंबईकडे कूच करणार आहे. आज दिवसभराचा बाराबाभळी ते रांजणगांव असा प्रवास असणार आहे. बाराबाभळीमधून सकाळी 9 वाजता जरांगे निघणार असून, सुपा येथे दुपारच भोजन करणार आहे. तसेच रांजणगाव (गणपती) येथे आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. 

आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्यात जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, आणि हीच सरकारची अडचण आहे. 60 ते 70 वर्षांचा आमचा लढा आहे, मात्र तरीही आम्हाला आरक्षण दिले नाही. मुख्यमंत्री यांच्यामुळे आतापर्यंत 7 महिन्याचा वेळ दिला, परंतु आता मुंबईत जाणारच आणि आरक्षण मिळवणारच या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता लढाई आरपारची आहे. गोळ्या झाडल्या तरी चालेल, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. मी असेल नसेल सरकारने काही षडयंत्र रचल्यास हे आंदोलन असेच ताकदीने सुरू ठेवा, असे जरांगे म्हणाले. 

राम उत्साह साजरा करणार...

आज देशभरात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ayodhya Ram Mandir Inauguration) साजरा केला जात आहे. दरम्यान, आम्ही देखील या उत्साहात सहभागी होणार असल्याचे जरांगे म्हणाले. आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आम्ही देखील रामभक्त असून, आम्हाला देखील याचा आनंद आहे. मात्र, सोबतच आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा असल्याचेजरांगे म्हणाले. 

ठिकठिकाणी जेवणाची सोय...

मुंबईला निघतांना मराठा आंदोलकांनी सोबत जेवणाची सोय म्हणून अन्नधान्य, पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल, बिस्कीट असे पदार्थ घेण्याचे आवाहन जरांगे यांनी केले होते. गरज पडल्यास ज्या ठिकाणी थांबू तिथेच स्वयंपाक करून आपल्या जेवणाची सोय करावी लागेल असेही जरांगे म्हणाले. मात्र, प्रत्यक्षात मागील दोन दिवसांत आंदोलकांना एकही दिवस स्वतः स्वयंपाक करण्याची वेळ आली नाही. कारण दुपारी आणि रात्रीच्या थांब्याच्या ठिकाणी स्थानिक गावकरी यांच्याकडून जेवण्याची सोय करण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhagan Bhujbal : "सध्याचा काळ ओबीसींच्या दृष्टीने फार अडचणीचा"; मराठा आरक्षणावर काय म्हणाले छगन भुजबळ?

14:39 PM (IST)  •  22 Jan 2024

मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

Manoj Jarange : जरांगे यांच्या  मुंबई आंदोलनाच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर बाराबाभळी येथील मदरशावर अक्षरशः भगवे झेंडे लावण्यात आले होते. एखाद्या मदरशावर पहिल्यांदाचा भगवे झेंडे पाहायला मिळाले. त्यामुळे यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम एकता पाहायला मिळाली आहे.  

https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-mumbai-march-saffron-flags-were-hoisted-on-madrasas-mumbai-rally-maratha-reservation-marathi-news-1249186

14:36 PM (IST)  •  22 Jan 2024

Manoj Jarange : मराठा आरक्षण मिळाल्यावर अयोध्येला जाणार; मनोज जरांगेंची घोषणा

Manoj Jarange : मराठा आरक्षण मिळाल्यावर अयोध्येला जाणार; मनोज जरांगेंची घोषणा https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-said-go-to-ayodhya-ram-mandir-darshan-after-maratha-reservation-marathi-news-1249215

11:48 AM (IST)  •  22 Jan 2024

मनोज जरांगे राम मंदिरात दर्शन घेणार

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज शहराजवळील भिंगार गावातील राम मंदिरात मनोज जरांगे आरती करून दर्शन घेतील. याच निमित्ताने ते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपला सहभाग नोंदवणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget