एक्स्प्लोर

मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

Manoj Jarange Mumbai March : मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले असून, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर मुस्लीम आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. 

Manoj Jarange Mumbai March : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघाले असून, बाराबाभळी येथील मदरशात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. विशेष म्हणजे जरांगे यांच्या याच दौऱ्याचा पार्श्वभूमीवर बाराबाभळी येथील मदरशावर अक्षरशः भगवे झेंडे लावण्यात आले होते. एखाद्या मदरशावर पहिल्यांदाचा भगवे झेंडे पाहायला मिळाले. त्यामुळे यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम एकता पाहायला मिळाली आहे. तर, मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले असून, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर मुस्लीम आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतो असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. 

दरम्यान यावर पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "मदारशावर मुस्लिम बांधवांकडून भगवे झेंडे लावण्यात आले होते. कालचा दुसरा दिवस होता आणि आज तिसरा दिवस आहे. कामं सोडून मराठा समाज रस्त्यावर आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. मुस्लिम बांधवांनी कालची व्यवस्था केली, हिंदू मुस्लिम एकोपा गरजेचं आहे. लोकशाही राज्य असून, प्रत्येकाला आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. धर्म विषय वेगळा आणि मागणी वेगळी आहे. मुस्लिम बांधव आमच्या मागणीला साथ देण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी पाठिंबा दिला. पहिल्यांदा मदरशावर भगवा झेंडा पाहायला मिळाला. इथे भगवा झेंडा आणि मनोज जरांगे आहे. इथे फक्त मुस्लिम नाही तर हिंदू मुलं सुद्धा शिकतात, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

धनगर-मुस्लीम आरक्षण कसं मिळत नाही पाहतो...

मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या मुस्लीम आरक्षणावर बोलतांना जरांगे म्हणाले की,“एकदा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न मिटू द्या, मग धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण कसं मिळत नाही ते बघतो. त्यांनी साथ दिली, नाही दिली तरी पाठिंबा आहे. धनगर बांधवांना सुद्धा आरक्षण मिळवून द्यायचं आहे, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगेंच्या आंदोलनात चक्क मदरशावर फडकले भगवे झेंडे; हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश

मुख्यमंत्र्यांवर प्रतिक्रिया...

मनोज जरांगे यांनी आपलं मुंबई आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “माझी त्यांना विनंती आहे, अडचण सरकार आणि प्रशासनाकडून होत आहे. त्यांनी ओळखून घ्यावं की, गावागावात लाखोने समाज एकवटला आहे. उभा राहायला सुद्धा जागा नाहीये. तुम्ही चर्चेसाठी दार बंदची भाषा करता. मुंबईच्या गल्लीत गल्लीत आणि राज्यातल्या रस्त्या रस्त्यावर मराठेच असणार आहे, त्यामुळे 26 तारखेच्या आधी आरक्षणाचा निर्णय घ्यावा असे जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

आरक्षण घेऊन आल्यास अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारतो: मनोज जरांगे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget