एक्स्प्लोर

शेगाव संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं आज निधन झालं.

बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं आज निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावमध्ये भक्तांनी येऊ नये असं संस्थानने आवाहन केलं आहे. घराजवळ असलेल्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. कुठल्याही रुग्णालयात दाखल होण्यास भाऊंनी नकार दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाऊंवर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह ट्रीटमेंट करण्यात येत होती. काल (3 ऑगस्ट) सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला.. तब्येत अधिक गंभीर झाली. मेडिकल टीमने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आज सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी भाऊंनी अखेरचा श्वास घेतला. 

‘सेवा परमो धर्म’ या तत्त्वानुसार  निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ म्हणजे माणसामधला देवमाणूस. वयाच्या अठराव्या वर्षी श्री आज्ञेने शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती  या त्रिसूत्री नुसार काम करत शिवशंकरभाऊंनी मंदिर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे. कुठलाही मोबदला न घेता संपूर्ण निष्ठेने आणि श्रध्देने  काम करणारे मंदिरातील हजारो सेवाधारी, डोनेशन सारख्या आर्थिक लाभला डावलून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थानच्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, भक्तनिवास, जागतिक किर्तीचा आनंदसागर प्रकल्प आणि अशा अनेक सेवाकार्याची उभारणी शिवशंकरभाऊंनी केली. श्री गजानन महाराज संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची निस्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ञ, नियोजन तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. शिवशंकरभाऊंच्या अकस्मात निधनाने विदर्भाची पंढरी पोरकी झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन मनाला चटका लावणारे- शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, सात्विकता, समर्पण आणि सेवाभावाने सामाजिक कार्याचा वसा अव्याहतपणे जपणारे निष्काम कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन मनाला चटका लावणारे आहे. शेगांवच्या श्री गजानन महाराज संस्थानाच्या माध्यमातून त्यांनी गरजू, विद्यार्थी, आदिवासी समाजासाठी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. श्री गजानन महाराज संस्थानाच्या जडणघडणीत देखील शिवशंकरभाऊंच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे व नियोजनाचे मोठे योगदान आहे. स्वच्छतेला धार्मिक अधिष्ठान देत आनंदसागर सारखं नंदनवन त्यांनी उभं केलं. आध्यात्मिकतेला समाजसेवेची जोड देत शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर चालवलेला सेवायज्ञ अनेकांसाठी आदर्शवत आहे. शिवशंकरभाऊंच्या स्पृहणीय व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण आदरांजली!

शिवशंकर भाऊ कायम स्मरणात राहतील- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत म्हटलं की, "श्री संत गजानन महाराज शेगांव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. शिवशंकर भाऊ यांनी समर्पित वृत्तीने व प्रामाणिकपणे श्री गजानन महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासला. संस्थानचे पावित्र्य राखण्याबरोबरच संस्थानाला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक व धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकर भाऊ कायम स्मरणात राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती."

मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला- देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे. शिवशंकर भाऊ हे समर्पण भावाचे मूर्तिमंत होते. शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य होते. महाजनादेश यात्रेप्रसंगी सुद्धा शेगावला दर्शनाला गेलो, तेव्हा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने मी व्यक्तिगत मार्गदर्शकाला मुकलो आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.  ॐ शान्ति"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Thane : तयारी संपली, उद्या परिक्षेची वेळ, मुख्यमंत्री शिंदे दिघेंच्या स्मृतीस्थळीTOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
पुणे अपघात, आरोपी वेंदातला 15 दिवस ट्रॅफिक पोलिसांसमोबत काम; न्यायालयाने 'या' अटी व शर्तींवर दिला जामीन
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील 2 युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
Embed widget