एक्स्प्लोर
किरकोळ कारणावरुन पुण्यात एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
रस्ता कच्चा असतानाही शेजारी राहणारे हृषीकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी त्यावरुन दुचाकी नेली. तेव्हा रशीदभाई आणि त्यांच्यात वाद झाला.
पुणे : किरकोळ कारणावरुन पुण्यात एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावात मध्यरात्री एक वाजता ही घटना घडली. काही ग्रामस्थ झोपायला बाहेर असल्याने त्यांचं सुदैव म्हणावं लागेल. रशीदभाई तांबोळी असं त्यांचं नाव असून, ते साठ टक्के भाजले आहेत.
राशीदभाई यांचं किराणामालाचं दुकान आहे. त्यालागत काही दिवसांपूर्वी रस्त्याचं काम सुरु होतं. रस्ता कच्चा असतानाही शेजारी राहणारे हृषीकेश लोखंडे आणि किरण जाधव यांनी त्यावरुन दुचाकी नेली. तेव्हा रशीदभाई आणि त्यांच्यात वाद झाला. नंतर तो सामंजस्याने मिटला खरा पण हृषिकेश आणि किरणच्या डोक्यात सुडाची भावना होती.
त्यामुळेच काल (14 मे) मध्यरात्री एक वाजता रशीदभाई यांना फोन करुन दुकानातून सिगरेट आणि माचिस देण्याची बहाण्याने बाहेर बोलावलं. ते बाहेर येताच त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून माचिसने पेटवले. त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा बाहेर झोपलेल्या काही ग्रामस्थांना जाग आली. रशीदभाई यांना लागलेली आग त्यांनी विझवली आणि रुग्णालयात दाखल केलं. नारायणगाव पोलिसांनी हृषिकेश आणि किरणला याप्रकरणी अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
बॉलीवूड
बॉलीवूड
Advertisement