लॉजवर भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचा नग्न फोटोचे व्हॉट्सअॅप स्टेटस, महिलेची पोलिसांत धाव
लॉजवर भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप स्टेटला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
![लॉजवर भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचा नग्न फोटोचे व्हॉट्सअॅप स्टेटस, महिलेची पोलिसांत धाव Man posted nude photo of married women on WhatsApp status as she refused to meet him at lodge लॉजवर भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचा नग्न फोटोचे व्हॉट्सअॅप स्टेटस, महिलेची पोलिसांत धाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/07/c6d081f1c57611f978b2083661f28d07_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : लॉजवर भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवल्याच्या कारणावरुन संबंधित महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. आरोपीने या विवाहितेशी सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करताना व्हिडीओ आणि फोटो काढले होते आणि तिला लॉजवर येण्याची मागणी केली. तिने नकार दिल्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हॉट्सअॅप स्टेटला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपीवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील सांगवी परिसरातील वस्तीवर राहणाऱ्या विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण मच्छिंद्र वीर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील रांजणगाव इथला रहिवासी आहे. 26 वर्षीय तक्रारदार महिला ही आरोपीच्या बहिणीच्या शेजारी राहत होती. तो बहिणीकडे सप्टेंबर 2021 मध्ये आला असताना दोघांची ओळख झाली. तिचा पती कामाला गेल्यावर आरोपी तिच्या घरी बसण्यासाठी येत होता. यातून त्याने तिच्याशी गोड बोलून शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर या दोघांच्यात वारंवार विवाहितेच्या राहत्या घरी, लॉजवर शरीरसंबंध येऊ लागले. त्याने त्यावेळी शारीरिक संबंध करताना नग्नावस्थेत व्हिडीओ आणि फोटो काढले होते.
फेब्रुवारी 2022 मध्ये तो त्याच्या गावी निघून गेला. त्यानंतर एप्रिल महिन्यात आरोपीने फोन करत महिलेला लॉजवर भेटायला बोलावले. तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्याने तिने भेटण्यास नकार दिला. त्याच दिवशी त्याने तिला दोघांचे नग्न फोटो पाठवले. तसंच जर भेटली नाही तर हे फोटो पतीला आणि भावाला पाठवेन अशी धमकी आरोपीने महिलेला दिली. त्यानंतर काही वेळातच त्याने तिच्यासोबतच्या संबंधाचा व्हिडीओ तिला पाठवला. तरीही फिर्यादीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर 27 मे रोजी त्याने स्वतःच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो ठेवले. यानंतर मात्र महिलेने हालचाल केली. तिने आरोपीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा स्क्रीनशॉट काढत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)