एक्स्प्लोर
वाशिममध्ये माणुसकीला काळिमा, जखमी वानराला अमानुष मारहाण
कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारलं आहे.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कुऱ्हा गावात एका व्यक्तीनं जखमी वानराला लाठीकाठीने बेदम मारहाण करून जीवे मारलं आहे. तसेच या वानराच्या मृत्यूनंतर त्याला झाडाला उलटे टांगून चपलनेही मारहाण केली. विशेष म्हणजे या इसमानं या घटनेचा व्हिडीओ चित्रीकरण करून इतर ते व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल सुद्धा केले. पवन बांगर असं वानराला मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव असून, त्य़ाच्यावर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे प्राणीप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. व्हिडीओ पाहा
आणखी वाचा























