एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra HSC Class 12 Board Result 2017: बारावीचा आज निकाल!
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल. सकाळी 11 वा. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील.
बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल?
बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचं पीक आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. त्यामुळेच बोर्डाने काल सोमवारी तारीख जाहीर केली.
दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखांबाबत वेगवेगळे मेसेज फिरत होते. यातील काही मेसेजमध्ये तारखाही देण्यात आल्या होत्या. परंतु या निव्वळ अफवा असल्याचं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. कुठे पाहाल निकाल? http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट : निकाल कसा पाहाल ? बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. संबंधित बातम्या बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल? बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवांचं पीकअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
निवडणूक
Advertisement