Rohit Patil : रोहित पाटलांच्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीकडून 2 कोटींची कामे मंजूर
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या विकासासाठी 2 कोटींचे कामे महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात आली आहेत.
![Rohit Patil : रोहित पाटलांच्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीकडून 2 कोटींची कामे मंजूर Mahavikas Aghadi approves works worth Rs 2 crore for Rohit Patil's Kavthemahankal Nagar Panchayat Rohit Patil : रोहित पाटलांच्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीकडून 2 कोटींची कामे मंजूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/23/19002ecf6f6070fcb5a17a4b5285aea3_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Patil : रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या आणि राष्ट्रवादी पॅनेलची एकहाती सत्ता आलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या विकासासाठी 2 कोटींचे कामे महाविकास आघाडी सरकारकडून मंजूर करण्यात आली आहेत. कवठेमहांकाळ मधील गटार आणि रस्त्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. रोहित पाटील यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायत साठी २ कोटींची कामे
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) January 22, 2022
मंजूर केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे
मनपूर्वक आभार..!#rrpatil #wewillrise pic.twitter.com/THIHtot1Ja
नुकत्याच झालेल्या आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांची नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आली. 23 वर्षीय रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवत नगरपंचायत निवडणुकीत एकत्र आलेल्या विरोधकांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. या विजयाने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीची विजयी सुरुवात झालीच शिवाय राष्ट्रवादी पक्षातील रोहित पाटील यांचे वजन देखील वाढलं आहे.
अवघ्या तेवीस वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठेमंकाळ नगर पंचायत निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात रोहित पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसरीकडे रोहित पाटील यांच्यावर राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठी युवक अध्यक्षपदाची जबाबदार लवकरच सुपूर्द करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिवंगत आर. आर. पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा पाच ते सहा वर्षे सांभाळली होती. तसेच राज्यात राष्ट्रवादीला सक्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. तासगाव, कवठेमहांकाळ या विधानसभा मतदारसंघात आता रोहित पाटील यांच्याकडे उद्योन्मुख नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
Rohit Patil : साहस, संयम, संघर्ष, रोहित पाटील यांच्या विजयाचे 7 फोटो
Rohit Patil : रोहित पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात लवकरच मोठी जबाबदारी मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)