![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jyotirlinga : औंढा नागनाथनंतर परळी वैद्यनाथचीही महाशिवरात्री यात्रा सलग तिसऱ्या वर्षी रद्द
Mahashivratri 2022 : बीड जिल्ह्यातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथ महाशिवरात्री यात्रा कोरोनाच्या अनुषंगाने सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे.
![Jyotirlinga : औंढा नागनाथनंतर परळी वैद्यनाथचीही महाशिवरात्री यात्रा सलग तिसऱ्या वर्षी रद्द Mahashivratri 2022 jyotirlinga yatra at parali prabhu vaidyanath the 5th jyotirlinga canceled for third year Jyotirlinga : औंढा नागनाथनंतर परळी वैद्यनाथचीही महाशिवरात्री यात्रा सलग तिसऱ्या वर्षी रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/27/9fd98876a228be3c0f6eb618584e401e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mahashivratri 2022 : बीड जिल्ह्यातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथ महाशिवरात्री यात्रा कोरोनाच्या अनुषंगाने सलग तिसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. कोरोनाचे नियम पाळून भाविकांसाठी दर्शन आणि वैद्यनाथ मंदिराचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहेत. परंतु, महाशिवरात्रीची यात्रा मात्र यंदाही भरणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातून समोर आले आहे.
मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाशिवरात्री यात्रेवर मोठे निर्बंध होते. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असताना ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. तसेच, सलग तीन वर्ष यात्रा रद्द झाल्यामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावरदेखील मोठा परिणाम झाला आहे.
तर, काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने हिंगोली जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ येथील महाशिवरात्री यात्रा कोरोनामुळे रद्द केली. औंढा नागनाथनंतर परळी येथील प्रभु वैद्यनाथ महाशिवरात्री यात्राही कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांची नावे :
1. परळी वैजनाथ
2. भीमाशंकर
3. त्र्यंबकेश्वर
4. घृष्णेश्वर
5. औंढा नागनाथ
भारतातील 12 ज्योतिर्लिंगांची नावे :
1. सोमनाथ (गुजरात -गीर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश - श्रीशैल्य)
3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश - उज्जैन)
4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी, बीड जिल्हा)
6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका, पुणे जिल्हा)
7. रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
8. नागनाथ (महाराष्ट्र - औंढा नागनाथ,हिंगोली जिल्हा)
9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश - वाराणसी)
10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा)
11. केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्हा)
12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा).
महत्वाच्या बातम्या :
- Mahashivratri 2022 : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग, जाणून घ्या पौराणिक महत्व
- Mahashivratri 2022 : भारतातील 12 ज्योतिर्लिंग, जाणून घ्या पौराणिक महत्व
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)