एक्स्प्लोर

Maharashtra Winter Session 2024: राज्यातील सत्ता जैसे थे, सत्ता केंद्रात मात्र मोठा बदल; शासकीय बंगल्याचीही अदलाबदल

Nagpur News : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला नसला, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे. शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशदारावर हे सत्ता केंद्र बदलाचे दृश्य प्रकर्षाने जाणवत आहे.

Maharashtra Winter Session 2024 नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला नसला, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे. नागपूरातील रामगिरी म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या आणि देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या  शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशदारावर हे सत्ता केंद्र बदलाचे दृश्य प्रकर्षाने जाणवत आहे. रामगिरी बंगल्याचे प्रवेशद्वारावर कालपर्यंत असलेली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची पाटी काढून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. तर देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या नावाऐवजी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल झाले नसले, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे आणि तेच नागपुरात रामगिरी आणि देवगिरी या दोन शासकीय बंगल्यांच्या प्रवेशद्वारावर दिसून येत आहे.

विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार?

हिवाळी अधिवेशनाच्या तारखा समोर आल्याने त्या अनुषंगाने नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीला वेग आला आहे. दरम्यान, अधिवेशनात विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार? हा प्रश्न या निमित्याने आता विचारला जाऊ लागला आहे. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधीपक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याचे सजावटीचे काम सुरू आहे. मात्र आवश्यक असलेले संख्याबळ विरोधी पक्षाकडे नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बंगल्याच्या सजावटीचे काम सुरू आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांसाठी आरक्षित असलेला बंगला कोणाला मिळणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

कधी होणार हिवाळी अधिवेशन?

राज्यातील नवनिर्वाचित २८८ आमदारांचं सरकार स्थापन झाल्यानंतर १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. पण अद्याप सरकार स्थापन न झाल्याने २८८ आमदारांना एकत्र बोलवत सत्ता स्थापनेचं एक अधिवेशन मुंबईला होणार आहे. यासाठी २८८ पैकी ७८ हे पहिल्यांदा विधानसभेत पोहचले आहे. त्यात भाजपचे ३३, शिंदे गट शिवसेना १४, अजित पवार गट राष्ट्रवादी ८, ठाकरे शिवसेना १०, कांग्रेस ६, शरद पवार गट राष्ट्रवादी ४ व इतर ३ आमदारांचा समावेश आहे.

संबंधित बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Nagpur News : नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरातील कोराडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
Embed widget