Eknath Shinde On Devendra Fadnavis: मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव मीच सुचवलं, कारण...; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!
Eknath Shinde On Devendra Fadnavis: प्रगत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य मला, शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले हे माझे भाग्य असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
Eknath Shinde On Devendra Fadnavis मुंबई: उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. एक ऐतिहासिक शपथविधी महाराष्ट्राने पाहिला. सर्वांना न्याय देणारे हे सरकार आहे. आनंद देणारे हे सरकार आहे. प्रगत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य मला, शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले हे माझे भाग्य असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षात राज्यात आणि देशात एकच सरकार असल्याने पाठबळ दिले, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना धन्यवाद देतो, कारण हे दोघे आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून हा कार्यकाळ यशस्वी झाला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकीकडे विकास प्रकल्प, लाडके भाऊ, लाडक्या बहिणी समाजाचा प्रत्येक घटक या सरकारच्या मागे राहिला. मी आधी देखील सांगितलं होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन...देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी खूप सहकार्य केले, अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव सुचवले होते. आज मी त्यांचे नाव सुचवले, याचा मला आनंद आहे, कारण आम्ही एक टीम म्हणून काम केलं. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून असलेला अनुभव देखील आमच्या उपयोगाता आला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच न भूतो न भविष्यात असे बहुमत मिळाले. यावेळी आम्ही चाळीसचे साठ झालो, याचा देखील मला अभिमान आहे. आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून जनसेवेचे साधन आहे, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
आता मी डेडीकेड टू कॉमन मॅन-
सीएम म्हणजे कॉमन मन म्हणून काम केलं, पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिले. आता मी डीसीएम आहे, आता मी डेडीकेड टू कॉमन मॅन आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली.
कोणी सांगितले मी नाराज होतो, मी आधीच भूमिका जाहीर केली, माझा पाठिंबा होता, मी गावी गेलो तरी नाराज म्हणता, आता सूत्र कुठली आहेत ते शोधले पाहिजे, असा टोला देखील एकनाथ शिंदेंनी लगावला. मी कामाला महत्त्व देतो, विकासाला महत्त्व देतो, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
संबंधित बातमी:
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसांभोवती वादळ घोंघावतंय, ते शांत न झाल्यास...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?