एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसांभोवती वादळ घोंघावतंय, ते शांत न झाल्यास...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

Devendra Fadnavis Maharashtra CM: आज सामना अग्रलेखातून देखील देवेंद्र फडणवीसांना होय, ते पुन्हा आले असं म्हणत शुभेच्छा आणि टोला लगावला. 

Devendra Fadnavis Maharashtra CM: महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी तिघांनाही शुभेच्छा दिल्या. आज सामना अग्रलेखातून देखील देवेंद्र फडणवीसांना होय, ते पुन्हा आले असं म्हणत शुभेच्छा आणि टोला लगावला. 

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावांत रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, ईव्हीएम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!! विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल बारा दिवसांनीमहाराष्ट्रात नवे सरकार विराजमान झाले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे गुजरातचे बाहुले शिंदे उडाले, हा त्याचा सरळ अर्थ. मात्र त्या शिंद्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद तर ध्रुव बाळाप्रमाणे अढळ आहे, पण संघर्ष, अपमान, अवहेलना यांचे हलाहल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले हे महत्त्वाचे. 

फडणवीसांनी पक्षांतर्गत व बाहेरच्या विरोधकांचा काटा काढला-

आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री वेषांतर करून, काळोखात लपून-छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत. विधानसभेचा कौल भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने लागला. पूर्ण बहुमत मिळाले. इतकी 'धो-धो' मते पडून आपण विजयी झालो कसे? हा प्रश्न फडणवीस यांच्यासह समस्त भाजपला पडला. त्याच अचंबित चेहऱ्याने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. 'शपथविधीच्या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर चला', अशा जाहिराती वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. महाराष्ट्राचे दिवाळे वाजत असले तरी शपथ सोहळ्याची दिवाळी साजरी केली गेली. भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या. त्यांचे दोन मित्रपक्ष मिळून सवादोनशेचे पाशवी बहुमत असतानाही बारा दिवसांचा कालावधी सरकार स्थापनेसाठी का लागला? या काळात मावळत्या मुख्यमंत्र्यांचे रुसवे-फुगवे महाराष्ट्राने पाहिले. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार व तसे आपल्याला दिल्लीचे वचन आहे हा त्यांचा दावा होता. मी काम केले म्हणून हा विजय भाजपला मिळाल्याचे ते बोलत राहिले. मुख्यमंत्रीपदाशिवाय खाली काहीच घेणार नाही हा त्यांचा हट्ट होता. त्या हट्टाला न जुमानता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होत असताना महाराष्ट्रात आनंदाचे मोठे वातावरण आहे असे दिसत नाही. कारण जनतेला भाजपच्या विजयाचा संशय आहे. हा विजय खरा नाही हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी गावागावांत सुरू आहे. मारकडवाडीसारख्या ठिकाणी लोकांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न केला, पण 144 कलम लावून पोलिसी दडपशाहीने तेथे लोकशाहीचा गळा घोटला. मारकडवाडीचे हे लोण राज्यातील गावागावांत पसरत गेले तर कायदा- सुव्यवस्थेचे संकट निर्माण होईल. अशा वेळी नवे मुख्यमंत्री दडपशाही करणार की संयमाने वागणार? हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी व सुडाने वागणारे आहेत हा त्यांच्यावरचा ठपका ते कसा पुसणार? यंत्रणांचा गैरवापर व त्यातून दहशत निर्माण करून फडणवीस यांनी पक्षांतर्गत व बाहेरच्या विरोधकांचा काटा काढला.

फडणवीस गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय?

फडणवीस पुन्हा असेच वागणार असतील तर बहुमत कुचकामी ठरेल. बहुमताचा स्वीकार नम्रपणे करावा व महाराष्ट्र हितासाठी ते कारणी लावावे, असे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल. राज्यात अनेक प्रश्न थैमान घालीत आहेत. मराठा आरक्षणापासून रोजगारापर्यंत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून शेतमालास भाव देण्यापर्यंत. भाजपचा विजय झाल्यापासून मुंबईसारख्या शहरात मराठीद्वेष्टे साप वळवळू व फूत्कार सोडू लागले. मुंबईत मराठी माणूस अपमानित करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा डंका वाजवला, पण मुंबईत मराठी बोलण्यावर व मराठी जगण्यावर दहशतीची गिधाडे फडफडत आहेत व ही गिधाडे स्वतःला भाजप समर्थक म्हणवून घेत असतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय? हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत? लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे 44 हजार कोटींचा बोजा राज्यावर आहे. 1500 ऐवजी बहिणींना 2100 रुपये देऊ असे या मंडळींनी निवडणूक प्रचारात वचन दिले. त्यामुळे बोजा वाढत जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचेही वचन आहे. ही वचने पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक नियोजन व शिस्त लावावी लागेल. मिंधे काळात झालेल्या लुटमारीस पायबंद घालून हे राज्य चोर-दरोडेखोरांच्या हातून सुटले आहे, असा विश्वास जनतेला द्यावा लागेल. मराठा आरक्षणाचे काय करणार? जरांगे नावाचे वादळ फडणवीस यांच्या भोवती घोंघावत आहे. ते शांत झाले नाही तर राज्यात अनेक प्रश्न नव्याने उभे राहतील व सरकार अंतर्गत नवे विरोधक काड्या लावण्याचे काम हौसेने करतील. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावांत रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, ईव्हीएम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!! 

संबंधित बातमी:

Eknath Shinde : आता मी DCM आहे, डेडीकेटेड टू कॉमन मॅन, 24 बाय 7 काम करणार, देवेंद्रजींना पूर्ण सहकार्य देणार : एकनाथ शिंदे

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Chhatrapati Sambhajinagar: पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
पद्मश्री पुरस्काराची 'ऑफर' देऊन राजकीय नेत्यांना चुना लावला, नागपूरच्या नेत्याला राज्यसभेचं स्वप्न दाखवलं, संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे
Pannalal Surana Passed Away : दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दुःखद बातमी! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन; वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Election: कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलं, मोठा निर्णय घ्यायच्या हालचाली, 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Maharashtra Live Updates: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील राडा प्रकरण; भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
Chandrapur : दोस्तीती कुस्ती! शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण अन् शिवीगाळ; चक्क ईव्हीएम मशीनही फोडल्याची घटना
दोस्तीती कुस्ती! शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराची भाजप कार्यकर्त्याला मारहाण अन् शिवीगाळ; चक्क ईव्हीएम मशीनही फोडल्याची घटना
Anant Garje and Gauri Garje Case: गौरी गर्जे प्रकरणात पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; पोलिसांना जबाब देताना म्हणाली, '2022 पासून...'
गौरी गर्जे प्रकरणात पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; पोलिसांना जबाब देताना म्हणाली, '2022 पासून...'
Embed widget