(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Weekly Weather Forecast : राज्यात या आठवड्यातही अतिवृष्टीचा इशारा कायम; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामान
Maharashtra Weekly Weather Forecast : महाराष्ट्रात या आठवड्यातही अतिवृष्टीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने माहिती दिलीय.
Maharashtra Weekly Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Rain Update) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जीवित व वित्तहानी झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, महाराष्ट्रात या आठवड्यातही अतिवृष्टीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने सोमवारी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या आठवड्यातही दिलासा नाही, 'या' ठिकाणी रेड अलर्ट
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा येथे अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मुंबईत 4.18 मीटर उंचीच्या हायटाइडचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान समुद्रात 14 फूट उंच लाटा उसळतील. हायटाइडमुळे लोकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पाणी साचले आहे. दुसरीकडे, राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये 'चांगल्या ते समाधानकारक' श्रेणीत नोंदवला जात आहे. या आठवड्यातही तो त्याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. या आठवड्यात महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल? जाणून घ्या
मुंबई
सोमवारी मुंबईत कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आठवडाभर आकाश ढगाळ राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 60 नोंदवला गेला आहे.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 26 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हा संपूर्ण आठवडा ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत 52 नोंदवला गेला आहे.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. संपूर्ण आठवडाभर आकाश ढगाळ राहील आणि पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 31 तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 36 आहे, जो 'चांगल्या' श्रेणीत येतो.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आठवडाभर ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस पडू शकतो. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 27 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 23 आहे.
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या आठवड्यात आकाश ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान 29 आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'चांगल्या' श्रेणीत 4 आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nashik Rain : गंगापूर धरणातून हंगामातील पहिले आवर्तन, 3000 क्युसेक्सने विसर्ग, असा आहे धरण साठा
- Marathwada and Vidarbha Rain : मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत