Maharashtra Weather Update: मुंबई रायगडमध्ये रेड अलर्ट! कोकण उत्तर महाराष्ट्रात पाऊस झोडपणार, कुठे कोणता अलर्ट?
Maharashtra Weather Update: पुढील तीन ते चार तासात मुंबईसह मराठवाडा विदर्भ तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने सांगितलं.

Maharashtra weather Update: गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाची हजेरी लागली आहे. आज हवामान विभागाने संपूर्ण कोकणपट्ट्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून मुंबईसह रायगडला रेड अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील चार दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. IMD ने पुढील चार दिवस विविध ठिकाणी हाय अलर्ट दिलाय.
हवामान विभागाचा अंदाज काय?
अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे कोकण व गोवा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण कोकणपट्टीवर मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट आहे. बहुतांश विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला असून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.पुढील तीन ते चार तासात मुंबईसह मराठवाडा विदर्भ तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने सांगितलं.
16 Aug, 9 am, Mumbai possibility of light to mod rain intermittent during next 3,4 hrs.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 16, 2025
Parts of Vidarbh & adj areas of marathwada mod to heavy spells intermittent during next 3,4 hrs.
Konkan recd VH to EHR during night.
Watch IMD updates pic.twitter.com/X7ZTLszkm5
कोणत्या जिल्ह्याला हाय अलर्ट?
16 ऑगस्ट: रेड अलर्ट- मुंबई व रायगड
ऑरेंज अलर्ट: ठाणे, रत्नागिरी, पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथा
येलो अलर्ट: सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी ,हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया, गडचिरोली
17 ऑगस्ट: मुंबई ,ठाणे ,पालघरसह संपूर्ण कोकणपट्टीत ऑरेंज अलर्ट तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट: नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली ,नांदेड, वाशिम, बुलढाणा, जळगाव ,अकोला ,अमरावती, यवतमाळ, वर्धा ,नागपूर ,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली
18 ऑगस्ट: पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. तसेच बीड आणि लातूरमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
येलो अलर्ट: मुंबई ,पुणे, नगर, नाशिक , संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, धाराशिव व हिंगोलीत यलो अलर्ट देण्यात आलाय.
19 ऑगस्ट: पालघर ठाणे रायगड रत्नागिरी तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट
मुंबई नाशिक धुळे नंदुरबार सिंधुदुर्ग बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली तसेच चंद्रपूर भंडारा गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट आहे .























