Maharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! कोकण, विदर्भात पावसाची शक्यता
IMD Weather Update : आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे.
Maharashtra Weather Update Today : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक पावसाची (Rain Updates) शक्यता आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Update) देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम (IMD Weather Update) झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडील (South India) राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Alert) सुरु आहे. याचा प्रभाव राज्याच्या (Maharashtra Weather) हवामानावरही दिसून येत आहे. राज्यात कोकण (Kokan) आणि विदर्भात (Vidarbh) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.
कोकण, विदर्भात पावसाची शक्यता
मुंबई, पुण्यासह राज्यात पुढील 5-6 दिवसांत कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंड वाढेल. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहणार असून कोकण, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
पुढील 24 तासांत पावसाचा अंदाज
पुढील 24 तासांत, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कर्नाटक किनारीपट्ट भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात मध्यम ते दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा घसरणार आहे.
महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता
मुंबईतील तापमानातही घट होणार
मुंबईत (Mumbai Weather) 14 डिसेंबरनंतर तापमानात मोठी घट (Cold Weather) होण्याची शक्यता आहे. मुंबईतचं हवामान (Mumbai Winter) उत्तरेकडील वाऱ्यांवर अवलंबून असेल. सध्या तापमानात केवळ एक ते दोन अंशांची घट होऊ शकते. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा मुंबईच्या हवामानावर जास्त परिणाम होणार नाही. देशाच्या उत्तरेकडील भागात जोरदार पाऊस झाल्याशिवाय पारा मुंबईत फारसा घसरण्याची शक्यता नाही. दरम्यान, 14 ते 15 डिसेंबर दरम्यान काही भागात मुसळधार हिमवृष्टीची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी वाढेल.