एक्स्प्लोर

Maharashtra Weather Predictions: सतर्क राहा! मुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये चार दिवस अतिवृष्टी, हवामान खात्याचा इशारा 

मुंबई महानगर क्षेत्रासह (Mumbai Konkan Rain) कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुंबई :  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील (Mumbai Konkan Rain)सर्व जिल्ह्यात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा (Meteorological Department warning)दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लो लाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी नेण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.
 
पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी
या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी,  या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन  प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी.  जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

दरडग्रस्त भागातील लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे जे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्याला तातडीने मंजुरी द्यावी अशा सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या गावांच्या पुनर्वसनाला लागणारा दीर्घ काळ विचारात घेता आता तातडीची गरज म्हणून या भागातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे.

अनपेक्षिरित्या घडणाऱ्या गोष्टी गृहित धरुन तयारी करा
अतिवृष्टीच्या काळात काही नैसर्गिक गोष्टी घडणे अपेक्षित असते तर काही गोष्टी या अनपेक्षितपणे घडतात. आपण अपेक्षित गोष्टी गृहित धरून तयारी करतो परंतू ज्या अनपेक्षित गोष्टी घडू शकतात त्या गृहित धरून  प्रशासनाने त्याचीही तयारी करावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  या काळात मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेणे महत्वाचे आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांना संक्रमण शिबिरात हलवणे गरजेचे आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु आहेत, या कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, अशा विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.

रुग्णसेवेत अडथळा नको
अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन  रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजन चा साठा करून ठेवावा. वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष नको
कोविड काळात कोविड आणि पावसाळी आजार एकत्र आले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते याकडे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले तसेच पावसाळी आजार उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीवर विशेषत: मलेरियावर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSharad Pawar PC : 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या, शरद पवारांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 9 AM : 4 OCT 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
शरद पवारांचे संकेत; हर्षवर्धन पाटलांबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले दुपारपर्यंत....
Supriya Sule: अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरूय; मित्रासोबत गेलेल्या तरूणीवर अपहरण करून सामूहिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची पोस्ट
Ratnagiri Crime News : 'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
'दोन दिवस राहिलेत, जगून घे...', एक-दोन नाही तर 30 दुकानांसमोर आढळल्या धमकीच्या चिठ्ठ्या, रत्नागिरीतील घटनेने खळबळ
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
फक्त घोषणा बाकी, जे ठरलं त्याचाच डीपी ठेवला, हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
Raj Thackeray : मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
मराठवाडा, विदर्भानंतर आता राज ठाकरेंचं मिशन 'उत्तर महाराष्ट्र', नाशकात दोन दिवस बैठकांचा धडाका
Pune Crime: सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
सांस्कृतिक राजधानीत चाललंय काय? मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं बोपदेव घाटातून अपहरण अन् लैंगिक अत्याचार
Sharad Pawar : आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत आरक्षण जाऊ द्या
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांचा धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांचा धाक संपला? नागरिकांचा संताप
Embed widget