एक्स्प्लोर

उत्तरेकडील वाऱ्यांनी मुंबई पुरती गारठली, महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान, पुढचे 5 दिवस हाडं गोठवणारी थंडी

आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमानात घट झाली आहे.  राज्यात आज कुठे काय तापमान नोंदवले गेले? पुढील पाच दिवस कसे राहणार? हवामान विभागाचा अंदाज काय? पाहूया..

Weather update: गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात गारठा वाढलाय. उत्तरेकडील शीत लहरी महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. आज धुळ्यात तापमान 4 अंश सेल्सिअसवर गेल्याने नागरिक गारठल्याचं दिसलं. ही यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद आहे. नाशिकमध्येही तापमान घटलं असून निफाडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी मुंबईत महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाचा पारा होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस तापमानात कमालीची घट दिसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फिंगल चक्रीवादळाने राज्यातून थंडी गायब झाली होती. आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमानात घट झाली आहे.  राज्यात आज कुठे काय तापमान नोंदवले गेले? पुढील पाच दिवस कसे राहणार? हवामान विभागाचा अंदाज काय? पाहूया..

धुळ्यात नीचांकी तापमानाची नोंद 

राज्यात आज बहुतांश ठिकाणी तापमान घटले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व किनारपट्टी भागातही तापमानात घट झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. आज मंगळवारी (10 डिसेंबर) धुळ्यात या हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. धुळे जिल्हा आज 4 अंश सेल्सिअसवर गेला होता. वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. प्रशासनाने वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन केलं आहे.

नाशिकचा पारा गेला 8 अंशांवर 

उत्तरेकडील शीत लहरी  महाराष्ट्रच्या दिशेन येत असल्याने नाशिकमधे कडाक्याची थंडी पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील तपमानात घट झाल्यान नाशिककर गारठले आहे. निफडमध्ये आज 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत पार दोन अंशांनी वाढला असला तरीही गारवा कायम दिसतोय. शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेत आहेत. रब्बी पिकांना थंडी लाभदायक असली तरी द्राक्ष बागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

मुंबईत गारठा वाढला

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळ मुंबईत तापमान घसरले आहे.सोमवारी मुंबईत महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमानचा पारा होता. सोमवारी 13.7 अंशांवर असलेला तापमानाचा पारा आज वर चढला आहे. पण थंडीचा जोर कमी झाला नाही. पुढील 5 दिवस हे राज्यात थंडीचे असणार आहेत.आज मुंबईत किमान तापमान हे 23 अंशांपर्यंत जाईल. तर कमाल तापमान 28 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

रायगडमध्ये तापमान 18 अंशांवरून थेट 12 अंशावर 

फेंगल चक्रीवादळाच्या चाहुलीनंतर रायगड मध्ये थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता कडाक्याची थंडी पुन्हा सुरू झाली असून 18 अंश सेल्सिअस वर असणारे रायगडचे तापमान थेट 12 अंशावर घसरले आहे. हवेतील आर्द्रता कमी झाली असून कोरडेपणा वाढल्याने रायगड करांना स्वेटर आणि शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget