पुढील 48 तासांत उष्णतेची लाट! मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज
Maharashtra Weather : पुढील 48 तासांत मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात उष्ण, दमट हवामानाची शक्यता आहे. विदर्भात 7 मे पासून पावसाची शक्यता आहे.
![पुढील 48 तासांत उष्णतेची लाट! मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज Maharashtra Weather Update IMD Forecast Heatwave Alert kokan Unseasonal Rain Alert in Vidarbha Marathawada marathi news पुढील 48 तासांत उष्णतेची लाट! मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/07/29a346fe603f0de1cda4d94170a1d9cc1715020620054322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra Weather Forecast) पुढील 48 तासांत तापमानात वाढ (Temperature Rise) होण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. राज्याचे कमाल तापमान हळूहळू कमी होण्यापूर्वी काही दिवस वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवसात राज्यात तापमनात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
7 मे पासून अवकाळी पावसाची शक्यता
महाराष्ट्रात पुढील 48 तासात कमाल तापमानामध्ये वाढ होऊन त्यानंतर तापमान हळूहळू घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात सरासरी तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने बदल होण्याची शक्यता आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्याच उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात उष्ण, दमट हवामानाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात 7 मे पासून पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 6, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/bmckoqtEFW
राज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूरमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धाराशिवमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासोबतच विदर्भात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ, खबरदारीचं आवाहन
मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागात विजेच्या कडकडाटासह वाऱ्याचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे अनेक भागात उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाकडून घराबाहेर पडताना खबरदारीचे उपाय करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मे महिन्यात उकाडा वाढणार! उष्णतेची लाट, त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)