Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आजही तीव्र पावसाचे अलर्ट; पुढील 4 दिवस हवामान कसे? IMD चा सविस्तर अंदाज
Weather Update: मुंबई आणि ठाण्यात गेल्या 24 तासांत पाऊस झाल्याने तापमानात जवळजवळ 6-7 अंशांची घट झाली आहे.

Maharashtra Weather Update:राज्यात अवकाळी पावसाचे ढग आजही कायम आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडाटासह तुफान पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासांमध्ये देशातील हवामानात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालाय.बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडल्या असून ढगाळ हवामान असल्यामुळे उष्णता देखील कमी झाली आहे. मुंबई, कोकणपट्ट्यात अवकाळी पावसाच्या हजेरीने नागरिकांची धावपळ उडाली. गेल्या आठवड्यापासून प्रचंड तापमानाचा चटका जाणवत असल्याने काहीसा दिलासाही मिळालाय. राज्यभरात अवकाळी पावसाने शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, आजही बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाचा हायअलर्ट कायम राहणार असून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोकणपट्ट्यात सध्या मध्यम तीव्रतेचे ढग दिसून आले असून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात आजही पावसाचा जोर राहणार आहे. मुंबई आणि ठाण्यात गेल्या 24 तासांत पाऊस झाल्याने तापमानात जवळजवळ 6-7 अंशांची घट झाली आहे. दरम्यान, हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे आरोग्याच्या समस्यांकडे वेळीच लक्ष देण्याचा सल्लाही तज्ञांकडून देण्यात येत आहे. (IMD Forecast)
हवामान विभागाचा इशारा काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती इशान्य अरबी समुद्रावर कायम असून मध्य प्रदेशपासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे महराष्ट्रात सगळीकडे पावसाचा अलर्ट देण्यातअ आला आहे. आज कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट आहे. उद्यापासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र कोकणातून काहीसा कमी होणार असून विदर्भात पुढील तीन दिवस पुन्हा पावसाचेच वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
8 May, 8.30 am,Latest satellite obs indicate moderate intensity clouds over #Konkan region. Partly cloudy sky ovr parts of #interior_Maharashtra. Central parts of #MadhyaPradesh & around with scattered type clouds of mod intensity. #Mumbai #Thane cooler nights.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 8, 2025
Watch IMD updates pic.twitter.com/5UVVu5uhAG
कुठे कोणता इशारा?
आज बहुतांश महाराष्ट्रात पावसाचा इशारा कायम असून मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
8 मे – रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांना अलर्ट नसला तरी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
9 मे – अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार – येलो अलर्ट
मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता आहे.
10 मे – संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.
11 मे – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली – येलो अलर्ट
हेही वाचा:
उष्णतेच्या लाटेमुळं पावसाचं गणित बदलणार, नेमका कधी दाखल होणार मान्सून?























