Rain Update : अखेर राज्यात मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात, कोकणात ऑरेंज अर्लट तर मुंबई, पुण्याला यलो अलर्ट
Rain Update : राज्यात मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली असून अनेक भागात मान्सूनने हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
![Rain Update : अखेर राज्यात मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात, कोकणात ऑरेंज अर्लट तर मुंबई, पुण्याला यलो अलर्ट Maharashtra weather forecaste orange alert to kokan division due to monsoon detail marathi news Rain Update : अखेर राज्यात मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात, कोकणात ऑरेंज अर्लट तर मुंबई, पुण्याला यलो अलर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/c9984d248a59256648d76a8f495c50951687596809410645_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rain Update : राज्यातील अनेक भागात मान्सून(Monsoon) बरसला असून अनेक दिवासांच्या उष्णतेपासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान खात्याकडून यलो अर्लट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
मुंबई पुण्यासह राज्यात अनेक भागात अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने अखेर हजेरी लावली आहे.दरम्यान पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने दमदार एन्ट्री केली आहे. तर पुढील तीन ते चार दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसामुळे तापामानात कमालीची घट झाल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
तर नाशिक, साताऱ्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात देखील रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या आहे. पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा देखील सुखावल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.
ऑरेंज अलर्ट म्हणजे नेमकं काय?
पण जिल्ह्यांना देण्यात आलेला हा अर्लट म्हणजे काय हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. म्हणजे या जिल्ह्यामंध्ये नेमकी परिस्थिती कशी राहणार हे या अलर्टवरुन आपल्या लक्षात येण्यास मदत होऊ शकते. कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस असेल ठिकाणी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात येतो. ऑरेंज अलर्टमध्ये, रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते. ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता त्या भागामध्ये असते.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
तर यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिलेला इशारा असतो. हा इशारा सतर्कतेसाठी देण्यात येतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. यलो अर्लट म्हणजे त्या भागात साधारण ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते. ज्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात येतो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती नसते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)