एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा इतका धुमाकूळ कसा? यामागचं कारण काय? हवामान तज्ञ काय सांगतात?

Maharashtra Rain : ढगफुटीसारखा पाऊस का कोसळतोय? त्यामागे काय कारण?Maharashtra Weather : परतीच्या पावसाचा मुक्काम का वाढला?

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीच्या पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीचा पाऊस परत जातो, पण दिवाळी आली तर अद्याप परतीचा पाऊस सुरुच आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पुणे, सोलापूर, जालना आणि कोल्हापूरमधील काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला होता. यामागे काय कारण असेल... परतीचा पाऊस कधी जाणार? शहरातील पावसाचे प्रमाण का वाढले? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक आणि हवामान अभ्यासक प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. डॉ. पन्हाळकर यांनी परतीचा पावसाबद्दलची उत्तरे दिली आहेत.. (शब्दांकन - नामदेव कुंभार)

Q. राज्यातील पावसाचं प्रमाण का वाढलं?

हिंदी महासागराचे (Indian Ocean) तापमान वाढलेलं आहे. याची वाढ एक डिग्री इतकी आहे. म्हणजेच इतर महासागराच्या तुलनेत हिंदी महासागराचे तापमान एक डिग्रीनं वाढलं आहे. त्याचबरोबर इंडियन ओशन डायपोल (indian ocean dipole)यामध्ये अरबी समुद्राचं आणि बंगाल उपसागर (Bay of Bengal) या दोन्ही समुद्राच्या तापमानामध्ये असलेला बदल किती प्रमाणात आहे. जर अरबी समुद्राचे तापमान जास्त असेल तर त्याला आपण इंडियन ओशन पॉझिटिव्ह डायपोल असे म्हणतो आणि ज्यावेळी बंगालच्या उपसागराचं तापमान जास्त असेल तेव्हा आपण निगेटिव्ह डायपोल म्हणतो. यावर्षी इंडियन ओशन हा पॉझिटिव्ह असल्याचं दिसलंय. म्हणजे अरबी समुद्राचं तापमान वाढलेलं आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, अशी माहिती सचिन पन्हाळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.  

Q. महाराष्ट्रात दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस का?

महाराष्ट्रात आतापर्यंत 123 टक्के पडलेला आहे. दरवर्षीपेक्षा 23 टक्के जास्त पाऊस पडला आहे. मागील 40 ते 50 वर्षातील इतिहास पाहिला तर बंगाल उपसागरामध्ये वादळाची निर्मिती जास्त होत होती. पण आता अरबी समुद्रामध्ये जास्त वादळं निर्माण होत असल्याचं दिसतेय. लो प्रेशर एरिया निर्माण होण्याचं प्रमाणही जास्त वाढलेलं आहे. त्यामुळेच किनारपट्टी अथवा महाराष्ट्रासह केरळ आणि गुजरातमध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतेय. अरबी समुद्राचं तापमान जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे लो प्रेशर बेल्ट जास्त निर्माण होतात, असे सचिन पन्हाळकर यांनी सागितलं.

Q. परतीच्या पावसाचा मुक्काम का वाढला?

परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळत आहे. यावर आयएमडी आणि आयआयटीएमचे संशोधकही यावर अभ्यास करत आहेत. ला नीना (La Nina) याचं अस्तित्व निर्माण झालेलं यावर्षी दिसत आहे. ला नीना यामुळे परतीचा पाऊस अद्याप महाराष्ट्रात थांबल्याचं दिसतेय, असे सचिन पन्हाळकर यांनी सांगितलं. अरबी समुद्रामध्ये आणि अंदमानजवळ चक्रिवादळ निर्माण झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पाऊस वाढला आहे. ज्यावेळी समुद्रामध्ये चक्रिवादळाची निर्मिती होते, तेव्हा परतीचा पावसाचा मुक्काम वाढतो. 4 ते 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जायला हवा. पण अद्याप परतीचा पाऊस कायम असल्याचे दिसत आहे. तसेच वाऱ्याची दिशाही अद्याप बदलेली नाही, असेही सचिन पन्हाळकर यांनी सांगितलं.

Q. La Nina ला निना म्हणजे काय?

प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील भागाकडे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात वाहून आणतात आणि त्यातून पश्चिमेकडील भागात अतिवृष्टी होते. त्यालाच ला निना (La Nina) असे म्हणतात.

Q. ढगफुटीसारखा पाऊस का कोसळतोय? त्यामागे काय कारण?

ग्लोबल वॉर्मिंग अथवा क्लायमेट चेंजमुळे अशाप्रकारचा पाऊस पडत आहे. पावसाचे दिवस कमी होताना दिसत आहेत. जो पाऊस विभागला जायचा त्याची विभागणी झाल्याचं दिसत आहे. म्हणजे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये होणाऱ्या पावसाचे दिवस कमी होताना दिसत आहेत. ठराविक कालावधीमध्ये अथवा कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस होत असल्याचं आपल्याला दिसत आहे. त्यामुळे जसे तापमान वाढते तसे हवेची बाष्प सामावून घेण्याची क्षमता वाढते, त्यामुळे ठराविक कालावधीमध्ये पावसाचे प्रमाण वाढलेलं दिसत आहे.

Q. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस का कोसळतोय?

शहरांमध्ये बांधकामांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गाव-खेड्यापेक्षा शहरातील तापमान जास्त असते. त्यामुळे लो प्रेशर बेल्ट निर्माण होतात. अजूबाजूचा भागाकडून वारं शहराकडे येतं. तापमानातही वाढ होते, त्यामुळे शहरात जास्त प्रमाणात पाऊस कोसळत आहे.

Q. परतीचा पाऊस कधी जाणार?

उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे सूर्याचं भासमान सुरु झालं आहे. त्यामुळे लवकरच परतीचा पाऊस संपणार आहे. समुद्रातील तापमान वाढल्यामुळे लो प्रेशर बेल्ट तयार झाले आहेत, त्यामुळे परतीच्या पावसाला उशीर झाला आहे. पुढील सात ते आठ दिवसात परतीचा पाऊस परतेल, असा अंदाज आहे. हमान खात्यानेही त्या पद्धतीचा अंदाज वर्तवला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget