धनंजय मुंडे अजितदादांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव संतापले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा, पण...
Bhaskar Jadhav on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात केला जात आहे.
नागपूर : बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात केला जात आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळात दिसलेच नाही. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गाडीतून धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी हल्लाबोल केलाय.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर चहापानासाठी विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात जाण्याआधी धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी एकाच गाडीतून प्रवास करत ते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल झाले. यावरून भास्कर जाधव म्हणाले की, सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा होती, धनंजय मुंडे यामुळे भीतीनं आले नसावे. मात्र, आता त्यांना खात्री झाली असावी की आपल्याला वाचवलं जाईल त्यामुळे ते आले असावेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
भास्कर जाधवांचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावरून देखील भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधलाय. मी अनेक वेळा सांगत आलोय, लोकशाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळणं धोकादायक असतं. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्ष ताकदीनं असला तर अंकुश असतो. 42 मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी मुख्यमंत्री म्हणूनच सर्वच कारभार चालवतायत. दोन उपमुख्यमंत्र्यांना देखील काहीही मिळालं नाही. अधिवेशन काळात बिनखात्याचे मंत्री म्हणून या सरकारवर विक्रम नोंदवला जाईल. सरकारने आर्थिक स्थिती बळकट करणं आणि स्त्रोत शोधणं हे कर्तव्य असतं. मात्र, हे काय करणार, हे फक्त कर लादणार आहेत. आर्थिक शिस्त आणणं आवश्यक आहे. मोठं बहुमत असल्याने विचलित होण्याचे कारण नाही. राज्याच्या तिजोरीवरील खर्च कंट्रोल करा, कर लोकांवर न लादता कंट्रोल करा. निवडणूक जिंकण्यासाठी लोकप्रिय घोषणा होतात आणि नंतर लोकांकडून खर्च वसूल करतात. सवंग लोकप्रिय घोषणा केल्या जातात, ३६ हजार पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या. मार्च महिन्यातील पुरवण्या मागण्या मान्य केल्या, गोडबोले समितीत 10-15 टक्के बजेटच्या असतात. मात्र या सरकारने ती लिमिट क्रोस केली, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा