मुंबई, ठाणेसह कोकणात पावसाची शक्यता, पुढील चार दिवस बरसणार; IMD चा अंदाज
Maharashtra Weather Update : पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात (Maharashtra) ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. कुठे पावसाची हजेरी (Rain) दिसत आहे, तर कुठे उन्हाचे चटके बसत आहे. पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कुठे उष्णतेच्या लाटेचा अलर्ट (Heat Wave Alert) देण्यात आला आहे. मुंबई, ठाणेसह, पालघरमध्ये आज पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्येही पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. या भागात आजसह पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे.
या भागात पावसाची शक्यता
आज राज्यात विविध भागात पावसाची शक्यता आहे. आजपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात विविध भागात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, 29 मेपासून ते 1 जूनपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यत आहे. तसेच, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातह पावसाची शक्यता आहे.
या भागात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज आणि यलो अलर्ट
याशिवाय, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक याभागात कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच, अहमदनगर, पुणे याभागात कोरडं वातावरण असेल. दरम्यान, अकोला जिल्ह्यात मात्र तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे. आयएमडीने 29 मे रोजी अकोला जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेच्या यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यालाही 29 आणि 30 मे साठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
IMD चा अंदाज काय सांगतो?
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 28, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/q6XMzNHlrE
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. याउलट देशाच्या दुसरीकडे, पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पूर्व राजस्थानचे अनेक भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :