खूशखबर! येत्या 5 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, महाराष्ट्रात कधी बरसणार?
Monsoon Update : येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे.
मुंबई : मान्सूनच्या (Monsoon Update) आगमनाची प्रतिक्षा करणाऱ्या सर्वांसाठीच खूशखबर आहे. अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू पुढे सरकरत असून लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल (Kerala) होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. याआधी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल वातावरण
पुढील पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. मान्सून मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मेपर्यंत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं याआधीच दिली आहे.
Conditions favourable for onset of monsoon over Kerala in next 5 days: IMD
— Press Trust of India (@PTI_News) May 27, 2024
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार?
मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यंदा मान्सून काहीसा लवकर दाखल होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तर 10 ते 11 जून दरम्यान मुंबईत मान्सूनचं आगमन होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईत 'या' दिवशी मान्सून दाखल होण्याची शक्यता
महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहील, यंदा सरासरीच्या 106 टक्के मान्सून होईल, असा अंदाज देखील भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज
एल निनोची (EL Nino) परिस्थिती जाऊन ला निनोची (La Nino) परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यंदा पावसाळ्यात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. गेल्या वर्षी ला निनोच्या परिस्थितीमुळे मान्सून कमकुवत होता. मात्र, यंदा पाऊस समाधानकारक असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: Director General of Meteorology, IMD, Mrutyunjay Mohapatra says, "...The South West Monsoon rainfall over the country as a whole is likely to be 106% of the long-period average with a model error of 4%. Thus, above-normal rainfall is most likely over the country… pic.twitter.com/f2Ec2zSt4j
— ANI (@ANI) May 27, 2024
महत्त्वाच्या इतर बातम्या :