Maharashtra Weather : एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, हवामान विभागाची माहिती
Maharashtra Weather : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार एप्रिल (April) महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची (unseasonal rains) हजेरी लागत आहे. यावर्षी तर उन्हाळ्यात पावसाळा सुरु असल्याचे चित्र जाणवत आहे. कारण राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार एप्रिल (April) महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात 46.7 मिलिलिटर पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 1962 मध्ये एप्रिल महिन्यात 23.4 मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर या वर्षीच्या एप्रिलमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
एप्रिल महिना गेल्या 10 वर्षात सर्वाधिक उष्ण आणि सर्वाधिक थंड महिना
यंदाच्या एप्रिल महिन्यात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याववर्षी एप्रिल महिन्यात 46.7 मिलिलिटर पावसाची नोंद झाली आहे. सोबत हा एप्रिल महिना गेल्या 10 वर्षात सर्वाधिक उष्ण आणि सर्वाधिक थंड देखील राहिला आहे. या एप्रिल महिन्यात सर्वाधिक 44.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली तर 18. 4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद देखील झाली आहे. 1962 मध्ये 23.4 मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर या वर्षीच्या एप्रिल मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता
देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पाऊस (Rainy) पडत आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. दरम्यान, मे महिन्यात देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उन्हाचा दाह कमी करण्यासाठी विजेचा अतिवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्युत सेवा प्रभावित होऊन उद्योगधंद्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास परिणामी अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते. विजेची मुबलक पुरवठा न झाल्यास अनेकांनी ब्लॅक आऊटसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
उष्णतेच्या लहरींमुळे वातानुकूलित यंत्रे (AC) आणि पंखे (Fans) यांचा वापर वाढतो. यासारख्या उपकरणांमुळे विजेचा वापर वाढतो, त्यामुळे पॉवर ग्रीडवर जास्त दाब येतो आणि ब्लॅक आऊटचा धोका वाढतो. जास्त उष्णता विजेच्या उत्पादकतेला हानी पोहोचवते, याशिवाय ते लोकांसाठी घातकही ठरू शकते. यावर्षी उष्णतेचा सामना करणारा भारत हा एकमेव देश नाही. तर इतर अनेक देशांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Bloomberg Report: उष्णतेच्या लाटेमुळे अर्थव्यवस्था कोलमडणार, ब्लॅक आऊटचाही धोका