Weather Update: पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; पुण्यात येलो तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Weather Update:पुणे आणि परिसरात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे: राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहर परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसापासून शहरातील वातावरण ढगाळ आहे. पुढील 24 तासांसाठी पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या आठवड्यात पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील पाच दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे शहराला पावसाचा 'यलो' अलर्ट, तर जिल्ह्याला 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे.
नैर्ऋत्य मॉन्सूनच्या हालचालींमुळे या आठवड्याच्या सुरवातीपासून शहरात सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला होता त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. कमाल तापमानात देखील घट नोंदवण्यात आली होती. मात्र, हवामानात होणाऱ्या बदलांमुळे पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराला 'येलो' अलर्ट जारी आला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यात 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि परिसरात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. 19) आणि मंगळवारी (ता. 20) बुधवारी (ता. 21) कमाल तापमानात अधिक घट होण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यभरात मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण राज्याला 'यलो' अलर्ट दिला आहे. कोकण परिसरात सोमवार (ता. 19) आणि मंगळवारी (ता. 20); तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मंगळवार व बुधवारी (ता. 21) काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस; तर कोकणात रविवारी (ता. 18) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता
पुणे, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा, सातारा घाट विभाग, सोलापूर, सांगली, धुळे, नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे.























