ST Bus : प्रवासही करा अन् चित्रपटही पाहा, प्रत्येक एसटी डेपोत 100 आसनी चित्रपटगृह होणार
सार्वजनिक वाहतूक (public transport) आपण भक्कम केली पाहिजे, त्याशिवाय खासगी गाड्या कमी होणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
CM Eknath Shinde : सार्वजनिक वाहतूक (public transport) आपण भक्कम केली पाहिजे, त्याशिवाय खासगी गाड्या कमी होणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. ग्रामीण भागातील ST स्टॅण्ड रिकामे असतात. सकाळी एक एसटी असते आणि संध्याकाळी घेऊन जाणारी दुसरी असते. त्यामुळं 20 ते 30 रुपयांत त्या प्रवाशांना जर बस स्थानकावर मराठी चित्रपट पाहायला मिळाले तर बरं होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. एसटीचे डेपो सुंदर आणि स्वच्छ व्हावेत यासाठी चळवळ निर्माण झाली पाहिजे असेही ते म्हणाले.
समृध्दी महामार्गावर एसटी धावणार
समृध्दी महामार्गावर एसटी धावणार आहे. मात्र, त्यांना स्पीड लिमीट ठेवायला सांगा. आपली माणस भारी आहेत नाहीतर 150 च्या स्पीडने गाडी पळवतील असे मुख्यमंत्री म्हणाले. 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास दिल्यानंतर ते कसे प्रवास करणार असे बोलत होते. मात्र, मोठ्या संख्येनं प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. त्यांचाही विरंगुळा केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु आहे तसा एसटीचाही अमृतमहोत्सव आहे. सध्या गाव तिथे एसटी सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांची वैदकीय तपासणी झाली पाहिजे
एसटी कर्मचाऱ्यांची वैदकीय तपासणी झाली पाहिजे. ज्या कर्मचाऱ्यांची मुलं परदेशात शिकायला जाणार आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी 10 लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्या. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता हा तुमचा विषय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तिजोरीच्या चाव्या या आमच्या अर्थमंत्र्यांकडे आहेत. मी बोललो तर ते नाही म्हणत नाहीत. तो ही निर्णय आपण घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.
नाले सफाई नाही झाली तर अधिकाऱ्याला साफ करणार
एसटी डेपोमध्ये मराठी चित्रपट सुरु करणार आहे. यासाठी कामाला लागा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
50 ते १०० आसनांचं थेअटर सुरु करणार आहोत. जे कोणी केलं नाही ते आपण करायचे आहे. नाल्यात कोण गेलं होत का? मी गेलो होतो. नाले सफाई नाही झाली तर अधिकाऱ्याला साफ करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईत कुठे डेब्रिज आणि कचरा असेल तर फोटो पाठवा लगेच फरक दिसेल. ब्रिजच्या खाली सर्वत्र लाईट लावली आहे. काही जण म्हणाले हे काही दिवसांसाठी आहे. पण ते कायमस्वरुपी आहे. जे करतो ते सर्व कायम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
वारकऱ्यांना सर्व सुविधा देणार
यावर्षी मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात येतील. कारण आपण महिलांना 50 टक्के सूट आणि वृद्धांना मोफत प्रवास दिला आहे. त्यामुळं संख्या वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वारकऱ्यांना सर्व सुविधा देणार आहे. तसेच एसटी डेपोला मी सरप्राईज व्हिजीट करणार आहे. एसटी डेपोचे काँक्रीटीकरण करण्यसाठी 500 कोटी रुपये देणार आहे. पहिल्या टप्प्यात 250 कोटी देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलाने हेलिकॉप्टर फिरु नये का? फिरतो ना म. भिवंडीत दुधवाल्याने हेलिकॉप्टर घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.