एक्स्प्लोर
आगामी मंत्रिमंडळात 'हे' असतील संभाव्य मंत्री
नव्या संभाव्य मंत्रिमंडळात सध्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या यादीत भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले, राहुल कुल यांना तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे या नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई : आजच्या तारखेला बरोबर 5 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर, मी पुन्हा येईनची गर्जना करणारे फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी आतूर आहेत. मात्र विधानसभेच्या निकालाच्या आकडेवारीनंतर शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीची स्वप्न पडू लागली आहेत. आणि याच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन सत्तास्थापनेचा तिढा गुंतागुंतीचा होत चालला आहे.
असं असलं तरी राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापना होणार असल्याची शक्यता जास्त आहे. या नव्या संभाव्य मंत्रिमंडळात सध्याच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. या यादीत भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले, राहुल कुल यांना तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे या नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास या मंत्रिमंडळात संभाव्य मंत्री कोण असतील यावर एक नजर टाकुयात.
भाजपकडून यांना मिळणार संधी
देवेंद्र फडणवीस
आशिष शेलार
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
संजय कुटे
रणजीत पाटील
परिणय फुके
देवराव होळी
राहुल कुल
शिवेंद्र राजे भोसले
सुरेश खाडे
पंकजा मुंडे
राम शिंदे
गणेश नाईक
गिरिश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
बबनराव लोणीकर
सुभाष देशमुख
महादेव जानकर
सदाभाऊ खोत
संभाजी पाटील निलंगेकर
जयकुमार रावळ
शिवसेनेकडून यांना मिळणार संधी
एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरे
दिवाकर रावते
रामदास कदम
गुलाबराव पाटील
तानाजी सावंत
दीपक केसरकर
रविंद्र वायकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement